निवडणुकीच्या तोंडावर मुंबईची रंगरंगोटी

रस्ते-दुभाजकांचा नवा रंगावतार; सुशोभीकरणासह वाहतूक सुरक्षिततेला प्राधान्य
mumbai roads
mumbai roadssakal media
Published on

मुंबई : रस्त्यांवरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासह (Road divider beautification) रस्त्यावर वाहनचालकांना ते स्पष्ट दिसावेत. वाहने सुरक्षितरीत्या हाकता यावीत. याशिवाय अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांनाही पदपथांवरून सुरक्षितपणे चालता यावे यासाठी त्यांची रंगरंगोटी केली जात आहे. उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीत तसे निर्देश दिले होते. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (dr iqbalsingh chahal) यांनी सर्व विभाग कार्यालयांना तशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही सध्या वेगाने सुरू आहेत.

mumbai roads
आता क्लिनअप मार्शल नाही तर उपद्रव शोधक पथक नेमणार

निवडणुकांच्या तोंडावर या साऱ्या कामांची एकाचवेळी लगबग संपूर्ण शहरभर सुरू आहे, याविषयी विचारले असता ही कामे नियमित स्वरूपाची आहेत. आवश्यक त्या जागी, आवश्यक त्या वेळी ही कामे केली जातात. सध्या संपूर्ण मुंबईत एकाचवेळी मोठ्या स्तरावर ही कामे होत आहेत, असा दावाही प्रशासनाने केला आहे. तरीही पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना रंगरंगोटीचा मोसम सुरू झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.

कामे अशी

- चौकातील मध्यवर्ती दुभाजकांची स्वच्छता व नव्याने रंगकाम - दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजकांची बांधणी - दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड - वाहतूक बेटांचे सुशोभीकरण - प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी, चित्र रेखाटन -प्रमुख रस्त्यांवरील चौकांतील दुभाजक आणि पदपथांकडील अटीचा दगडही (कर्ब स्टोन) रंगवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.