मराठी भाषा अभिजात दर्जासाठी राज्यभरात लोकअभियान

मराठी भाषा अभिजात दर्जासाठी राज्यभरात लोकअभियान

Published on
मराठी भाषा अभिजात दर्जासाठी लोकाभियान मुंबई, ता. २ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक असलेले सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत, मात्र त्यासाठी दिरंगाई होत असल्याने हा विषय जनतेत घेऊन जाण्यासाठी राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये लोक अभियान राबवले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात दिली. लोक अभियान राबविण्यासाठी लवकरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत हे अभियान राज्यात राबवून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची चळवळ घराघरांत पोचवली जाणार आल्याचे देसाई यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ आणि तिची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोचविण्याचा हा एक प्रयत्न राहणार आहे. यातून राज्यभरात विविध चर्चासत्र, कार्यक्रम आदी राबवले जाणार आहेत. तसेच प्रत्येक विद्यापीठात असलेल्या मराठी भाषा वाड्मय मंडळ यांच्यामार्फत विविध कार्यक्रम हे विद्यापीठ आणि महाविद्यालयात आयोजित केले जातील. यासाठी मुंबई विद्यापीठात असलेल्या मंडळाने कार्यक्रमाला सुरुवात केली असल्याचेही देसाई यांनी सांगितले. ... केंद्राकडून दिरंगाई मराठी भाषेला दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाकडून केंद्र सरकारला हजारो पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यातील पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून यानंतरही राज्यभरातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या मागणीची पत्र पाठविली जाणार आहेत. अभिजात दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले मराठी, तमिळ, कन्नड आणि साहित्यातील अनेक पुरावे आम्ही सादर केले असून त्यात आता कुठलीही अडचण उरली नाही; परंतु केंद्राकडून याविषयी दिरंगाई होत असल्याची खंतही देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.