वसई : नातेवाईकांपासून महिलांना धोका; तब्बल २९२ बलात्काराच्या घटना
वसई : आपल्या ओळखीच्या व्यक्तींपासून, नातेवाईकांपासूनच (Relatives molestation) महिला असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०२१ या वर्षात तब्बल २९२ बलात्काराच्या घटना (Rape cases) घडल्या. यामध्ये तब्बल ३६४ आरोपींवर (accused) कारवाई झाली. यामधील बहुतांश आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे, नातेवाईक अथवा मित्र असल्याचे समोर आले आहे. मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, एकांताचा फायदा घेत, अक्षेपार्ह छायाचित्र काढून किंवा चित्रीकरण करून ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचे (police complaints) पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमधून स्पष्ट होत आहे.
काही महिला या त्रासाला कंटाळून पोलिसांची मदत घेतात तर काही घाबरून किंवा दबावाखाली गप्प राहतात. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात १०७३ बलात्काराचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले. २०२१ साली १९ महिलांचा खून झाला असून, ४१४ विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन शिबिर, स्वरक्षणासाठी संवाद पोलिस आयुक्तांकडून विविध पोलिस ठाण्यात साधला जात आहे.
मात्र, महिलांनी अशा घटनेला वेळीच रोखण्याची गरज असून अत्याचार करणाऱ्यांची तक्रार पोलिसांत दाखल केली तर आळा बसेल, असे मत सामाजिक संस्थांकडून व्यक्त केले जात आहे. दृष्टिक्षेपात एकूण गुन्हे - २९२ एकूण आरोपी - ३६४ ओळखीचे - १०० मित्र - १२३ शेजारी - २३ कुटुंबीय - ८२ अनोळखी - ३६ महिलांवर होणारे अत्याचार समाजातील महत्त्वाची समस्या आहे.
संस्थेच्या हेल्पलाईनवर अनेक प्रश्न येतात. ज्यात लहान मुलींना वाईट हेतूने स्पर्श करणारे ओळखीचे अधिक आहेत. महिलांना स्वरक्षणाचे धडे तसेच प्रबोधनाची गरज आहे.
- मिलिंद पोंक्षे, अध्यक्ष, जाणीव ट्रस्ट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.