zoo
zoosakal media

मुंबई : १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी खुली; पण...

Published on

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (byculla zoo) १० फेब्रुवारीपासून पुन्हा पर्यटकांसाठी (zoo starts from tenth February) खुले होणार आहे. मात्र, कोरोनाचे नियम (corona) पाळायचे असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागल्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ८० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण (corona vaccination) झालेल्या शहरीतील कोविडचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता मुंबईलाही दिलासा मिळाला असून राणीची बागही खुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

zoo
ठाणे : वेश्याव्यवसायातून चार महिलांची सुटका; दोन महिला एजंट जेरबंद

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या संंख्येत वाढ करण्यात येणार असून ३९ खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय खुले राहणार आहे. दरम्यान, पर्यटकांची संख्या क्षमतेपेक्षा वाढली तर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. कोविडची तिसरी लाट आल्यामुळे ४ जानेवारीपासून प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले होते. आता पुन्ही प्राणिसंग्रहालय खुले होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.