BMC ELECTION : भाजपच्या निवडणूक समितीत दिग्गज नेत्यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) तयारीसाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांनी जाहीर केलेल्या वेगवेळ्या समित्यांमध्ये आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), सुनील राणे, प्रसाद लाड, नगरसेविका शीतल गंभीर-देसाई आदींचा समावेश आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याशी सल्लामसलत केल्यावर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन असून समितीवर आमदार सुनील राणे, राजहंस सिंह आहेत. प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे समितीची जबाबदारी कांदिवलीचे (पू) आमदार अतुल भातखळकर यांच्यावर सोपविली आहे. विवेकानंद गुप्ता, अमरजित मिश्रा हेदेखील या समितीवर आहेत.
झोपडपट्टी संपर्क समितीवर तृप्ती सावंत असून आरोपपत्र समितीचे अध्यक्ष जुहूचे आमदार अमित साटम आहेत. बुथ संपर्क संजय उपाध्याय यांच्याकडे तर निवडणूक आयोग संपर्काची जबाबदारी प्रकाश मेहता व कृपाशंकर सिंह यांच्यावर सोपविली आहे. वॉररूमची जबाबदारी नगरसेवक प्रतीक कर्पे यांच्यावर, जाहीर सभांची जबाबदारी आमदार प्रसाद लाड यांच्यावर, व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवण्याचे काम राज पुरोहित यांच्यावर तसेच महिला संपर्काची जबाबदारी नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांना दिली आहे. ही माहिती मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.