तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाइन डे’ चे

तरुणाईला वेध ‘व्हॅलेंटाइन डे’ चे

Published on

वाशी, ता. ७ (बातमीदार) ःप्रेम व्यक्‍त करण्याचा दिवस म्हणून ओळख बनलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ चे तरुणाईला वेध लागले आहेत. सध्या विविध ‘डे’ चा साजरा करण्याचा सप्ताह सुरू असून व्हॅलेंटाइन डेचेही स्वरूप बदलले आहे. प्रेमाची व्याख्या बदलल्याने ते व्यक्‍त करण्याच्या पद्धतीही बदलल्‍या आहेत. मग ते प्रियकर-प्रेयसीचे असो व एका मुलाला आईबद्दल वाटणारे प्रत्येक वयातील आणि नात्यातील प्रेम या डे द्वारे व्यक्त केले जात आहे. १४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हॅलेंटाइन डे च्या आधी सात दिवसापासून सुरू असणारे डे साजरे केले जात आहे.
डे साजरे करत असताना ग्रीटिंग कार्डचा वापर तरुणाई नाकारत सोशल मीडियावरील व्हॉट्‌सअप, फेसबुक, ट्विटरचा, एसएमएस आदी पर्याय स्‍वीकारले जात आहेत. वर्षभरात प्रियजनांसोबत साजरे केलेले काही खास क्षण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या गिफ्टसह सेल्फी काढून स्वत:च्या आवडीचे किंवा गायलेले गाणे प्रियजनांना ऐकविले जात असून डेजनुसार प्रत्येकजण दररोज स्टेटस चेंज करीत असून डीपी आणि आयकॉनही बदलत आहे. ई-मेलच्या माध्यमातून देखील शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

तरुणाईची ऑनलाईन शॉपिंग
ऑनलाईन शॉपिंगमध्ये भेटवस्‍तूंचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. नवनवीन संकल्पनेतून साकारलेल्‍या भेटवस्‍तू खरेदी करण्यात वाचणारा वेळ आणि वेगवेगळ्या ऑफर्समुळे ऑनलाईन शॉपिंगला तरुणवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५० ते ६० टक्केपर्यंत सूट देण्यात आली असून वेगवेगळे सुगंधी परफ्युम, डिझायनर ज्‍वेलरी आणि बँडेड बॅग, लॉकेट आदि वस्तू उपलब्ध आहेत.

भेटवस्तूची चलती
इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, मोबाईल अशा अनेकविध उत्पादनांमध्ये चायनामेड वस्तूंनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हातातील कडे, ब्रेसलेट, चेन आदी कपल ज्‍वेलरी, कपल वॉच, प्रेमाचा संदेश लिहिलेले मग आणि फोटोफ्रेम, टेडी, डान्सिंग कपल्स, झोपाळ्यावर निवांत बसून गप्पा मारणारे प्रेमीयुगुल अशा अनेकविध भेटवस्तू बाजारात उपलब्‍ध असून बहुतांश चायनामेड आहेत. या वस्‍तूंचे दरही परवडणारे असल्‍याने मोठ्‌या प्रमाणात खरेदी होत असल्‍याचे बाबूलाल अग्रवाल या विक्रेत्‍याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.