मुंबई : खेळाचे मैदान उरणार की नाही ? खेळाडू चिंताग्रस्त
प्रभादेवी : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park ground) भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक (Lata Mangeshkar memorial) उभारावे की उभारू नये, यावरून वाद सुरू आहेत. शिवाजी पार्कमध्ये स्मारक होईल किंवा होणार नाही, ही पुढची गोष्ट आहे; मात्र भविष्यात तिथे खेळाचे मैदान (Playing ground issue) राहील की नाही, याची चिंता शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी आणि तरुण खेळाडूंनी ‘सकाळ’कडे (sakal) व्यक्त केली.
शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्याविषयी राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे आहेत; मात्र खेळाचे मैदान हे केवळ खेळासाठीच असले पाहिजे, त्या ठिकाणी स्मारक नको, अशी प्रतिक्रिया परिसरातील जनतेकडून येत आहे. शिवाजी पार्क मैदानात खेळपट्टी तयार करण्यासाठी मैदानाची खूप मशागत करावी लागते. मैदानात माती टाकून ती एका लेव्हलला आणण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. याच खेळपट्टीवर मंडप उभारल्यावर खेळपट्टीची नासधूस होते, असे शिवाजी पार्क इथे सराव करणाऱ्या तरुण खेळाडूंचे म्हणणे आहे. मंडप किंवा अन्य बांधकाम करताना खेळपट्टी सोडून बाहेरील बाजूस बांधकाम करणे अपेक्षित असते, मात्र तसे होत नाही. त्यामुळे परत खेळपट्टी करावी लागते, असेही खेळाडूंनी सांगितले.
निवडणुकांच्या वेळेस सभेला परवानगी देता ते ठीक आहे; मात्र खेळाचे मैदान हे खेळापुरतेच मर्यादित राहिले पाहिजे. एखाद्या थोर व्यक्तीबद्दलचे प्रेम मनात असावे, स्मारकात नाही.
- अमोल वाडेकर, मॉर्निंग वॉकर
खरे तर गवत उगवलेल्या खेळपट्टीवर क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळले जाते. ते गवत उगवण्यासाठी खूप कालावधी लागतो. मेहनतदेखील घ्यावी लागते. मंडप बांधल्याने खेळपट्टी बिघडते.
- सुनील पाटील, माहीम जुवेनिल स्पोर्टस् क्लब
लतादीदींबद्दल सर्वांच्या मनात प्रेम, आदर आहे; मात्र जर स्मारकासाठी शिवाजी पार्क मैदान वापरले, तर खेळासाठी मैदानच उरणार नाही. दादर व आजूबाजूच्या नागरिकांसाठी हे हक्काचे असे मैदान आहे. इथे अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी, फेरफटका मारण्यासाठी, खेळण्यासाठी येत असतात.
- प्रीत परब, स्थानिक
गर्दीच्या दृष्टिकोनातून एखाद्या थोर व्यक्तीला त्या ठिकाणी अग्नी देणे, ही बाब समजू शकतो; मात्र खेळाच्या मैदानावर स्मारक बांधणे उचित ठरणार नाही. आधीच खेळासाठी मैदाने कमी असताना स्मारकाचा घाट नकोच!
- केदार भोगटे, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.