व्हॅलेंटाईन साजरा करा, पण...!
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई : सध्याच्या ऑनलाईन (Online) युगात तरुणाई समाज माध्यमात अखंड बुडालेली असते आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine day) असेल तर काही सांगायला नको. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी विविध क्लृप्त्या ही तरुणाई लढवते. अनोळखी व्यक्तीवरही या दिवशी आपले प्रेम व्यक्त (love feelings) केले जाते व पुढे त्यांच्याविषयी वाईट समजले की पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे समाज माध्यमावर (social media) व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेम व्यक्त करताना, अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याचा (alert suggestion) सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.
विविध माध्यमांचा पसारा सध्या वाढला आहे. मैत्रीचे आकर्षण निर्माण होऊन मग आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली जाते; परंतु यातील अनेक जण अनोळखी मैत्रीचा गैरफायदा घेतात, विश्वासघात करतात. याचे भान मात्र चूक समजल्यावर उमगते व त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यासाठी धाव घेतली जाते. तरुणाई व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असते.
अशावेळी माध्यमांचा सर्रास वापर करून जोडीदाराला भुरळ घालण्यात येते; परंतु हे केवळ आकर्षण असून पुढे गंभीर परिणामाला सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाच्या फुलापासून ते अगदी विविध आकर्षक भेटवस्तू देऊन जोडीदाराला खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. जोडीदाराला फिरायला नेले जाते; परंतु अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
व्हॅलेंटाईनचा अर्थ देखील माहीत नसलेले या दिवशी प्रेमात बुडतात. अनोळखी व्यक्तीसोबतची मैत्री खाईत देखील लोटते, याची पुसटशी कल्पना बऱ्याच मुलींना नसते. समाजमाध्यमावर अशा घटना अधिक घडतात. त्यामुळे हा दिवस साजरा करताना परक्या व्यक्तीपासून सावध राहणे हेच शहाणपण ठरेल.
- मिलिंद पोंक्षे, अध्यक्ष, जाणीव ट्रस्ट.
समाजमाध्यमावर अनेक बनावट ओळख निर्माण करणारे अकाऊंट असतात. अशावेळी फसवणूक झाल्यावर तरुणींचे मानसिक संतुलन बिघडते. अशा अनेक घटना घडतात. जोडीदार शोधताना खोलवर जाऊन विचार करणे गरजेचे आहे. व्हॅलेंटाईन कुटुंबासोबत देखील साजरा करता येतो. समाजमाध्यम चांगले आहे, मात्र आपण कोणत्या बाबींवर लक्ष देतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. वंदना पवार, मानसोपचार तज्ज्ञ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.