मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो आणि कारचा अपघात; दोघांचा मृत्यू
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) टेम्पो आणि कारच्या अपघातात (Tempo-car accident) कारमधील दोघांचा मृत्यू (two people death) झाला आहे. हा अपघात भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील ओवळी गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या युवकांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यज्ञेश शरद तरे (वय २१) व मयूर संजय पाटील (वय २०) अशी अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे काल्हेरपाडा येथील रहिवासी होते. दोघे जण आपल्या मित्रांसोबत रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या भिवंडी ठाणे महामार्गावरून कारने (एमएच. ०४ केडब्ल्यू ६३६४) मानकोलीच्या दिशेने जात होते. ते ओवळी खिंड पार करून थोडे अंतर पुढे आले असता पाठीमागून भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिली.
धडक बसल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पी.यु.सी. सेंटरला ड्रायव्हरच्या बाजूने धडकली. तसेच तिथून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यामुळे कारमधील दोघा जणांचा मृत्यू झाला. कारमधील जखमी मित्र चिराग दत्ता पाटील (वय २०) याने या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हयगयीने टेम्पो चालवून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिरसाट करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.