electric vehicles
electric vehicles sakal media

ठाणे : चार वर्षांपासून रखडलेला चार्जिंग स्टेशनचा प्रकल्प मार्गी लागणार

ठाण्यात ई-वाहनांसाठी ५० चार्जिंग स्टेशन
Published on

ठाणे : जागेअभावी गेल्या चार वर्षांपासून रखडलेला चार्जिंग स्टेशन (Electronic vehicle) उभारण्याचा प्रकल्प अखेर मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिका (Thane municipal corporation) सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार ई-वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आता शहरात ५० ठिकाणी ‘पीपीपी’ तत्त्वावर चार्जिंग स्टेशन्स उभारणार (charging station) आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३० ठिकाणी ही स्थानके उभारली जाणार असून, ठाणे महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

electric vehicles
दिवंगत बप्पी लाहरींच्या नातवाचं आपल्या 'दादू'ला इमोशनल पत्र!

वास्तविक ठाणे पालिकेने चार वर्षांपूर्वीच शहरामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील १०० ठिकाणी हे स्टेशन उभारले जाणार होते, पण आवश्यक भूखंड न मिळाल्याने हा प्रकल्प बारगळला. त्यामुळे पालिकेने आता नव्याने या चार्जिंग स्टेशनचा प्रस्ताव तयार केला आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरणानुसार सर्व प्रभाग समित्यांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रती १० लाख लोकसंख्येमागे ५० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ३० ठिकाणी ही स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

प्रभाग समित्यांतर्गत लोकवस्ती असलेल्या रस्त्यांच्या कडेला ही स्टेशन्स उभारली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे ४ ते ५ मीटर रुंद आणि २० ते ३० मीटर लांब जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. पालिकेने या ३० जागांची यादीसुद्धा तयार केली आहे. हे स्टेशन्स उभारणीसाठी लागणारी जागा आणि सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी पालिकेची असणार आहे; तर स्टेशन उभारणीसाठी वीजपुरवठा, इंटरनेट सेवा, पाणीपुरवठा, कर्मचाऱ्यांचा विमा याची जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे.

electric vehicles
मुंबई : हिणवणाऱ्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला शिक्षेत सवलत

ठळक वैशिष्ट्ये

- केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार ही सेवा देणे कंत्राटदाराला बंधनकारक
- चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी महापालिकेचे फलक लावणे बंधनकारक
- वीज युनिटसाठी किमान १ रुपया शुल्क कंपनीला महापालिकेस अदा करावे लागणार

प्रभाग समितीनिहाय चार्जिंग स्टेशन
* नौपाडा - कोपरी
पाचपाखाडी हुंडाई शोरूमसमोर
मेंटल हॉस्पिटल चौक
चिखलवाडी जंक्शन
कोपरी गाव जंक्शन

* उथळसर
वृंदावन सोसायटी बसस्टॉप
कचराळी तलाव
आकाशगंगा रोड
साकेत चौक

* वागळे इस्टेट
रोड नंबर २२, वागळे इस्टेट

* लोकमान्य- सावरकर नगर
लोकमान्यनगर बस डेपो
पोखरण रोड क्रमांक १, देवदयानगर जंक्शन

* वर्तक नगर
बेथनी हॉस्पिटल
घाणेकर नाट्यगृह
मानपाडा जंक्शन
निळकंठ ग्रीन्स

* माजिवडा - मानपाडा
आनंदनगर डेपो
पातलापाडा
आनंदनगर जंक्शन
लोढा, माजिवडा
हायलॅण्ड हेवन, बाळकूम
वाघबिळ जंक्शन
पातलीपाडा,

* कळवा
खारेगाव ९० फूट रोड
खारेगाव टोल नाका
विटावा जकात नाका
रेतीबंदर पारसिक खाडी

*मुंब्रा
मुंब्रा फायर ब्रिगेड
शिळ-दिवा रोड जंक्शन
शिळ फायर ब्रिगेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.