crime
crime sakal media

नवी मुंबई : गुटखा, अमली पदार्थ विक्रेत्यांना जरब; तब्बल 460 आरोपी गजाआड

Published on

नवी मुंबई : गुटखामुक्त शहर असा नारा दिलेल्या नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) गेल्या दीड वर्षापासून बेकायदा व्यावसायिकांना (illegal gutkha business) जरब बसविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला शंभर टक्के यश मिळाले नसले तरी गुटखा व अमली पदार्थ विक्रेत्यांचे (Drug Peddlers) पोलिसांनी कंबरडे मोडले. पोलिसांनी कारवाईनुसार गेल्या वर्षी २०८ गुन्हे दाखल केले; तर चार कोटी ३४ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणात ४६० आरोपींना (culprit arrested) अटक केली.

 crime
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करा"

नवी मुंबई शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी पुढील काळात कारवाई सुरूच राहणार आहे, असा निर्धार पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले. २०२१ मध्ये अमली पदार्थासंबंधी ८८ छापे टाकण्यात आले. यात विविध पोलिस ठाण्यांतर्गत ६१; तर गुन्हे शाखेने २७ कारवाया केल्या. कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन कोटी ९० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त करून ११० आरोपींना अटक केली. त्याचप्रमाणे गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांविरोधात १२० कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या. यात विविध पोलिस ठाणे अंतर्गत ८४ ; तर गुन्हे शाखेकडून ३६ कारवाया करण्यात आल्या. कारवायाअंतर्गत तब्बल एक कोटी २५ लाख ७३ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला, तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त ३५० आरोपींना अटक केली, अशी माहितीही बिपीनकुमार सिंह यांनी दिली.

भीक मागणाऱ्यांमुळे लौकिकास बाधा

देशातील राहणीमान योग्य शहरासह स्वच्छ सर्वेक्षणात देशात व राज्यात अग्रेसर असलेल्या नवी मुंबई शहराची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे. या शहरातील स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक होत असताना या शहरातील चौकाचौकात व सिग्नलवर भिकारी व तृतीयपंथीयांचा वाढता वावर शहराच्या लौकिकाला बाधा ठरत असल्याचे आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २०२१ मध्ये नवी मुंबई पोलिसांनी सिग्नलवर भीक मागणाऱ्या २५८ व्यक्तींवर कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबई हे शहर भिकारीमुक्त करण्याचाही प्रयत्न असल्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.