Accident Deaths
Accident Deathssakal media

नवी मुंबईतील अपघातांत २६९ मृत्‍यू; दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक

Published on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालय (Navi Mumbai Police) हद्दीत वर्षभरात घडलेल्या एकूण ७३७ अपघातांपैकी २६५ प्राणांतिक अपघातांत २६९ व्यक्तींचा मृत्यू झाला (People death in accidents) आहे. विशेष म्हणजे अपघातातील मृतांमध्ये दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. दुचाकीस्वारासह सोबतची व्यक्ती असे एकूण ११३ जणांचा मृत्‍यू झाला आहे; तर ४७५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. कार अपघातात (car accidents) २१ जणांचा मृत्यू झाला असून यात १२ कारचालक आहेत, तर उर्वरित ९ सहप्रवाशांचा त्यात समावेश आहे. ७९ पादचाऱ्यांनाही विविध अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Accident Deaths
Sakal Impact: राम मंदिर स्थानकात सुरक्षेकडे लक्ष देणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

विशेष म्हणजे दुचाकी अपघातात मृत झालेल्यांपैकी ३० दुचाकीस्वार हे स्वतःच्या चुकीमुळे रस्ता दुभाजकावर अथवा दुसऱ्या वाहनावर धडकल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे. तसेच अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत २९, ट्रेलरच्या धडकेत १६, तर कारच्या धडकेत १० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची नोंद नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आली आहे.
त्याचबरोबर विविध मार्गावरील अपघातांची आकडेवारीसुद्धा वाहतूक पोलिसांनी काढली असून यात सर्वाधिक ४३ अपघात पळस्पे-जेएनपीटी मार्गावर घडले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंब्रा डी-पाँईट मार्गावर घडलेल्या १७ अपघातांत १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सायन-पनवेल मार्गावर घडलेल्या १५ अपघातांत १५ व्यक्तींचा, ठाणे-बेलापूर मार्गावर घडलेल्या १३ अपघातांत १३ व्यक्तींचा, तर पामबीच मार्गावर वर्षभरात घडलेल्या ११ अपघातांत १३ जणांचा बळी गेला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीन वर्षांत वाहतूक विभागाने कठोर कारवाई केली आहे. २०२१ मध्ये ८ लाख ५१ हजार ८४१ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Accident Deaths
माणगाव काळनदीच्या पात्रात मगरीची दहशत; मच्छीमारावर हल्ला

यात हल्मेट न वापरणाऱ्या १ लाख ७२ हजार दुचाकीस्‍वार, ओव्हर स्पीड वाहने चालविणारे ८४ हजार ९४, धोकादायकरीत्या वाहन चालविणे १३ हजार ८२६, सिग्नल तोडणारे २४ हजार ७९१ तसेच सिट बेल्टचा वापर न करणारे ५० हजार ४८३, तर वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे ७, ८२१ वाहन चालकांचा समावेश आहे. कारवाईत दोषी आढळलेल्या एकूण ६५०१ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारसही आरटीओ विभागाकडे करण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई वाहतूक विभागाने २०१९ मध्ये ५ लाख ५५ हजार १६८ वाहनचालकांवर कारवाई केली होती. तसेच २०२० मध्ये ७ लाख १९ हजार २८० वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

लॉकडाऊननंतर अपघात वाढले

कोरोनामुळे २०२० मध्ये संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात मुंबई-नवी मुंबई दरम्यानच्या दोन्ही बाजूच्या मार्गावर २७ लाख १४ हजार १३१ वाहनांची नोंद झाली आहे; तर २०२१ मध्ये तब्बल ७७ लाख १५ हजार १७१ वाहनांच्या वर्दळीची नोंद झाली आहे. यावरून २०२० मध्ये वाहनांची वर्दळ कमी असल्याने अपघात घटल्‍याचे दिसते. मात्र २०२१ मध्ये वाहनांची संख्या वाढल्‍याने अपघातांत, तसेच मृतांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे.

रस्ते अपघातात दुचाकी अपघातांची व मृतांची संख्या वाढल्‍याचे आढळल्‍याने ते रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर होणारे बहुतेक अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपले व इतरांचे जीवन सुरक्षित करावे.
- पुरुषोत्तम कराड, उपआयुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई.

वाहतूक विभागातील नोंद

वर्ष - अपघात - मृत्‍यू
२०२१ - ७३७ -२६९
२०२० - ५३१ - १८५
२०१९ - ७६२ - २२०

पोलिसांची कारवाई

हेल्मेट न वापरणारे - १ लाख ७२ हजार
ओव्हर स्पीड -८४ हजार ९४
धोकादायकरीत्या वाहन चालविणे -१३ हजार ८२६
सिग्नल तोडणे - २४ हजार ७९१
सिट बेल्ट न वापरणे - ५० हजार ४८३
मोबाईलवर बोलणे - ७ हजार ८२१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()