मुंबादेवी: लग्नासाठी नाव नोंदणी; तरुणीला ४५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
मुंबादेवी : विवाह नोंदणी संकेतस्थळावर (Matrimonial Sites) नाव नोंदवलेल्या तरुणीला ४५ लाख रुपयांना गंडा (forty lac money fraud) घालणाऱ्या दोघांना वरळी सायबर पोलिसांनी (worli cyber police) अटक केली. अझहर अन्सारी (वय २१) व राजकुमार पांडेय अशी या दोघांची (culprit arrested) नावे आहेत. विवाहेच्छुक तरुणींना लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी कार्यरत होती.
तरुणींनी दिलेले पैसे बनावट खात्यांत जमा करण्यात येत होते. यासंदर्भात तक्रारदार तरुणीने वरळी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तक्रारदार तरुणीला आरोपीने प्रथम लग्नाचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर तिच्याकडे अमेरिकी डॉलर सोडविण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने विविध कारणे सांगून तिच्याकडून ४४ लाख ९३ हजार रुपये बँक खात्यांत भरण्यास सांगितले. लग्नाच्या बाबतीत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे तरुणीला संशय आल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली.
सायबर विभाग पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी तपासासाठी पथक तयार केले. त्यानंतर बँक खात्याची माहिती पोलिसांनी मागवून घेतली असता यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती काम करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपी अझहर अन्सारी याला कुर्ला येथून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार राजकुमार पांडेय याला ॲन्टॉप हिल येथून अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.