Ram Mandir Railway Station
Ram Mandir Railway Stationsakal media

Sakal Impact: राम मंदिर स्थानकात सुरक्षेकडे लक्ष देणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

Published on

गोरेगाव : पश्चिम रेल्वेच्या (Western railway) राम मंदिर (Ram Mandir railway station) स्थानकावर सुरक्षेचे तीन-तेरा वाजले आहेत. स्थानकात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने महिलांच्या सुरक्षेकडे (Woman security) दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘सकाळ''ने शुक्रवारी (ता. १८) प्रकाशित केले होते. या बातमीची स्थानिक रिपाइं कार्यकर्त्यांनी (RPI) दखल घेत महिलांच्या सुरक्षेची मागणी केली. यावेळी रेल्वे प्रशासनाने (Railway Authorities) बंदोबस्तात वाढ करण्याचे आश्‍वासन दिले.

Ram Mandir Railway Station
मानखुर्द : अमली पदार्थ विकणारी टोळी जेरबंद; पदार्थमिश्रित २०० बाटल्या जप्त

राम मंदिर स्थानक परिसरात रेल्वे पोलिस दलाच्या माध्यमातून महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा करण्याच्या बाबतीत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. परिसरातील सुरक्षा आणि गस्त वाढवावी, या मार्गावर गर्दूल्ले हैदोस घालत असतील त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन रिपब्लिकन पक्ष गोरेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले.

यावेळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सलमान खान, रमेश पाळंदे, महिला आघाडीच्या छाया राऊत, रेश्मा खान व गोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश पाईकराव, दीपक सहेजराव यांच्या शिष्टमंडळाने राम मंदिर रेल्वेस्थानक व्यवस्थापक गुप्ता यांना निवेदन सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.