st bus
st busSakal Media

"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करा"

Published on

घाटकोपर : दहावी व बारावीच्या लेखी (ऑफलाईन) परीक्षा (Offline exam) घेण्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra education board) जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्रे (Exam center) देण्यात आली आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आहेत.

st bus
प्रभाग पुनर्रचनेसाठी याचिका, भाजप कार्यकर्त्यांना HC ने ठोठावला दंड

एसटीचा संप अजूनही कायम असल्याने काही ग्रामीण भागात एसटीची एकही फेरी होत नाही. विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये याकरिता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनिहाय परीक्षेच्या वेळेनुसार पर्यायी व्यवस्था म्हणून ‘विशेष एसटी सेवा’ सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले यांनी ई-मेलद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.