महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्या; देसाई यांची सरकावर टीका
मुंबई : महिला धोरण मसुद्याच्या पुढच्या आवृत्त्या प्रतापगडावर (Pratapgad) प्रसिद्ध करण्यासोबतच राज्यातील महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षेकडे (woman Protection) गांभीर्यपूर्वक लक्ष द्या; तरच छत्रपती शिवरायांना ती खरी आदरांजली ठरेल, अशी टीका भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal gambhir desai) यांनी सरकारवर केली आहे.
महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काही प्रमुख धुरिणांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रतापगडावर जाऊन महिला धोरण मसुद्याची चौथी आवृत्ती शिवप्रतिमेच्या चरणी अर्पण केली; मात्र असे करण्यासोबतच प्रत्यक्ष महिला सुरक्षेवर लक्ष दिले नाही, तर अशा समारंभांना काहीही अर्थ उरणार नाही. महिलांना माता-भगिनींप्रमाणे सन्मान देणाऱ्या शिवरायांचा आदर्श सत्ताधाऱ्यांनी घ्यावा, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे.
आज राज्यात कधी नव्हे एवढ्या महिला असुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे कोणाचेच लक्ष नाही, सत्ताधारी नेते-कार्यकर्तेच महिलांवर अत्याचार करीत आहेत. महिलांचे संरक्षण करणाऱ्या संस्थांमधूनही फक्त राज्यातील विरोधक नेत्यांनाच विनाकारण नोटिसा देण्याचा पराक्रम गाजवला जात आहे. सत्ताधारी नेत्यांनी महिलांवर अत्याचार केल्यास या संस्थांवरील महिला त्यांच्याकडे काणाडोळा करीत आहेत. अशा स्थितीत फक्त शिवछत्रपतींच्या महिला धोरणाची सनद प्रसिद्ध करून काहीही होणार नाही. त्याऐवजी शिवछत्रपतींचे महिलांबाबतचे आचार-विचार अभ्यासून ते राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिकवावेत व स्वतः आचरणात आणावेत, असेही देसाई यांनी सुनावले आहे.
महिलांबद्दल बेताल वक्तव्ये
राज्यातील सत्ताधारी पक्षांचेच नेते महिलांबद्दल बेताल वक्तव्ये करतात. गेली किमान ३० वर्षे काँग्रेसला उपदेशाचे डोस पाजणारे नेते आता उघडपणे पत्रकार परिषदांमध्ये, शेजारी महिला कार्यकर्त्या बसलेल्या असतानाही विरोधकांना महिलांवरून शिवीगाळ करतात. त्यांच्यावर महिला संस्था कोणतीही कारवाई करीत नाहीत. अशाने कार्यकर्त्यांना कोणाचाही धाक उरणार नाही. त्याचमुळे महिलांना कमी लेखण्याची व महिलांचा अवमान करण्याची वृत्ती राज्यात सर्वत्र वाढते आहे, याचीही सत्ताधाऱ्यांनी नोंद ठेवावी, असेही देसाई यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.