मुंबईत सर्व न्यायालयांत लोकअदालतीचे आयोजन; प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा
धारावी : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे (criminal cases) , तसेच दिवाणी दावे सामंजस्याने मिटविण्याबाबत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे वेळोवेळी लोकअदालतीचे (Lokadalat) आयोजन करीत असते. त्या अनुषंगाने शनिवारी १२ मार्चला मुंबईतील सर्व न्यायालयांत (courts in mumbai) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळेससुद्धा ई-लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या (video conferencing) माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.
ज्या पक्षकारांना प्रकरणे लोकअदालतीत ठेवावयाची आहेत, त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपापल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकरात लवकर सादर करावा व प्रकरण सामंजस्याने तत्काळ मिटवावे, असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहन्मुंबईचे प्रधान न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फलके व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.
या प्रकरणांचा समावेश
धनादेश अनादर
बँकेची कर्जवसुली
कामगारांचे वाद
विद्युत व पाणी देयके
तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे
आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोडपात्र प्रकरणे
मोटार अपघात नुकसानभरपाई
वैवाहिक वाद प्रकरणे
लोकअदालतीचे फायदे
१. प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते.
२. निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.
३. आपसी सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसा दोन्हींची बचत होते.
४. पक्षकारांना आपली बाजू स्वतः मांडण्याची संधी मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.