रोहा : ६१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पिता - पुत्राविरोधात गुन्हा
रोहा : फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन कंपनी (construction company) आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला आहे. या कंपनीने ६१ लाखांची फसवणूक (Sixty one lac money fraud) केल्याची तक्रार रोहा येथील राजेश काटकर (Rajesh katkar) यांनी केली आहे. त्यानुसार रोहा पोलिस ठाण्यात (Roha Police station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल लाड करत आहेत.
हॅप्पी होम इस्टेट को.ऑ. सोसायटी, मिरा नगर ठाणे येथे राहणारे योगेंद्र हजारी पांडे व शशिकांत योगेंद्र पांडे यांनी विघ्नहर्ता सिव्हिल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी या नावाची कंपनी २०१५ साली स्थापन केली होती. याद्वारे ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व कंपनीच्या प्लॉट बुकिंगच्या नावाने आरडी, एफडी पेन्शन अशा गुंतवणूक योजना राबवत होते. गुंतवणूक रकमांवर कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांनी आठ जणांकडून ६१ लाख ३७ हजार ३०० रुपये रोखीने स्वीकारले होते.
तसेच गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या रकमेचे गुंतवणूकदारांना प्रमाणपत्राचे वाटप केले होते. काही महिन्यांनंतर गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांनी तगादा लावला; पण संचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रोहा येथील राजेश काटकर यांनी पांडे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.