दुबईत नोकरीच्या निमित्ताने फसवणूक; इस्लामउद्दीन अन्सारी गजाआड
पनवेल : दुबईत नोकरीचे आश्वासन (job decoy) देऊन दोघा व्यक्तींनी मुंबई व नवी मुंबईत राहणाऱ्या अनेक बेरोजगार तरुणांकडून हजारो रुपये उकळल्याचे (Money fraud) उघडकीस आले. साजिद खान आणि इस्लामउद्दीन अन्सारी अशी त्यांची नावे असून कामोठे पोलिसांनी (Kamothe police) त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा (Fraud crime) दाखल केला आहे. इस्लामउद्दीन अन्सारी याला अटक केली आहे.
मुंबईतील चिता कॅम्प भागात राहणाऱ्या सय्यद सफाद उल्ला नियामत उल्ला (३८) याची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली होती. यादरम्यान, त्याला कामोठे येथील न्यू स्टारलाईन मल्टिपल सर्व्हीसेस सोल्यूशन कंपनीचा भागीदार साजिद खान व इस्लामउद्दीन अन्सारी हे दुबई येथे नोकरीला लावून देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सय्यद सफाद याने ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची भेट घेतली.
त्यावेळी या दोघांनी दुबईतील नोकरीसाठी ४० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. सय्यद सफाद याने त्यावेळी त्यांना रोख १० हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी सय्यद सफाद याला अल्तावार फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस कंपनीचे ‘ऑफर लेटर’ दिले. मात्र नोकरी दिली नाही. अशाच प्रकारे १६ बेरोजगार व्यक्तींकडून ३० ते ७० हजार रुपये उकळून त्यांना नोकरी न देता, त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.