Kalyan RPF
Kalyan RPFsakal media

कल्याण: भुवनेश्वर एक्सप्रेसमधून लाखोंचा गांजा हस्तगत; तीन जणांना अटक

Published on

कल्याण : भुवनेश्वर एक्स्प्रेसमधून (bhubaneshwar express) इगतपुरी ते कल्याण रेल्वेस्थानकदरम्यान (Igatpuri-kalyan railway station) लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या (Ganja smuggling) तीन जणांना कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या (three culprit arrested) पथकाने सापळा रचून अटक केली. सम्राट पात्रा (२६, नवी मुंबई), संजू गाझी (१९, नवी मुंबई), अजगर खान (२९, टिटवाळा) अशी तिघांची नावे आहेत.

Kalyan RPF
मच्छीमार असल्याचा दाखला तहसीलदारांकडून घ्यावा लागणार

कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक भूपेंद्र सिंह यांना खबऱ्याकडून एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी पी. रुपडे, ए. पी. सिंग, ए. योगेश कुमार, ए. उस्मान अली, ए. सरोज आणि ए. सोंबीर आदींच्या पथकाने मंगळवारी (ता. २२) भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी ते कल्याण रेल्वेस्थानक दरम्यान सापळा रचला होता.

यावेळी संशयित व्यक्ती डब्यात एकमेकांशी भांडताना दिसल्या. सुरक्षा बलाचे पथक त्यांच्याजवळ गेले असता त्या पथकाला पाहून ते घाबरले आणि सीटखालून बाहेर आलेल्या तीन जणांनी सीटखाली असलेल्या ट्रॉली बॅग पायाने ढकलण्यास सुरुवात केली. त्यावरून पोलिसांनी बॅगबद्दल विचारले असता, त्यांनी त्या आपल्या असल्याचे सांगितले.

कल्याण स्थानकात एक्स्प्रेस आली असता, पोलिसांनी बॅग तपासल्या असता, त्यात गांजाचे ५५.३९५ किलो वजनाचे २६ बंडल आढळून आले. त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत पाच लाख ५३ हजार ९५० रुपये इतकी आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.