Pen - Urban Bank
Pen - Urban Banksakal media

"खोटी वल्गना करून शिशिर धारकर पेण- अर्बन बँक ठेवीदारांना भूलथापा देतात"

Published on

पेण : पेण अर्बन बँकेची (Pen-urban Bank) मालमत्ता विकून एक-दोन वर्षांत ठेवीदारांना पैसे परत देणार, अशी खोटी वल्गना करून शिशिर धारकर (Shihsir Dharkar) ठेवीदारांना भूलथापा देत आहेत, असा आरोप संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव (Naren jadhav) यांनी शनिवारी (ता.२६) पेण येथे पत्रकार परिषदेत केला. बँकेची मालमत्ता ही त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. संघर्ष समिती ११ वर्षे उपोषणे, आंदोलने, निदर्शने व न्यायालयीन लढा (Court case) लढवित आहे. आता शेवटच्या टप्प्यात लढा आला आहे. मात्र या पैशांवर डल्ला मारण्याचा हेतू धारकर यांचा आहे. तो आम्ही हाणून पाडणार आहोत, असेही जाधव यांनी सांगितले.

Pen - Urban Bank
शिवसेना-भाजपने कल्याण-डोंबिवली शहरासाठी काहीही केलं नाही; राजू पाटलांचा घणाघात

पेण अर्बन बँक घोटाळा २०१० मध्ये उघडकीस आला. त्यावेळच्या सहकार मंत्र्यांना धारकर यांनी दर महिन्यात ४० कोटी बँकेत भरणा करू, असे लेखी पत्र दिले होते. मात्र एक दमडीसुद्धा त्यांनी भरली नाही. धारकर खोटे बोलले आहेत. त्या काळात बँकेचे अध्यक्ष आणि तज्ज्ञ संचालक पद हे भूषविले. अर्बन बँकेमध्ये २००१ पासून घोटाळे सुरू होते. २०१० पर्यंत १८९ विनातारण, विना कागदपत्रे कर्ज देण्यात आली होती. या प्रकरणांमधून २ हजार ६३५ कोटींहून अधिक रक्कम कर्ज म्हणून वाटप करण्यात आले.

या सर्व गोष्टी माहीत असतानाही ते बनाव करीत आहेत. सहा कंपन्या बोगस बनवून मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडून ४८० कोटी रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज १७० दिवसांत फेडायचे होते; परंतु ते कर्ज न फेडल्याने सीबीआय चौकशी झाली. बँकेचा घोटाळा समोर आला. याउलट आपण काहीच केले नाही, असे ते भासवत आहेत. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा चाललेला खटाटोप नागरिक हाणून पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे जगदीश पेरवी, सुनील देशमुख, गजानन गायकवाड, हरिभाऊ कदम, विभावरी भावे, सुरेंद्र जाधव, नामदेव कासार, दिलीप दुबे व सुरेश वैद्य आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()