Corona Fight
Corona Fightsakal media

ठाणे जिल्हा कोरोनामुक्तीकडे, दैनंदिन रुग्ण संख्येने नीचांक गाठला

Published on

ठाणे : दोन वर्षांपासून मुक्कामी असलेला कोरोना ठाणे (Thane corona update) जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत रुग्ण संख्येने (corona patients) पहिल्यांदाच नीचांक गाठला असून, दैनंदिन रुग्ण संख्या २२ वर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रभाव असलेल्या ठाणे शहरातील दैनंदिन रुग्ण संख्या (Daily corona patients) ११ पर्यंत खालावली आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईसह मिरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात रोज ० ते २ रुग्णांची नोंद होत आहे. सक्रिय रुग्ण (corona active patients) संख्याही १७३ पर्यंत आल्याने ठाणे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

Corona Fight
कल्याण: सिग्नल तोडल्यास ई चलनाचा दणका; बेशिस्त वाहनचालकांविरोधात मोहीम

मार्च २०२० मध्ये दाखल झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेने अवघ्या पाच महिन्यांत ठाणे शहरात ९०० रुग्णांचा मृत्यू झाला; तर ठिक एक वर्षानंतर एप्रिल २०२१ मध्ये धडकलेल्या दुसऱ्या लाटेने दैनंदिन रुग्णसंख्या दीड हजारांच्या घरात पोहचली. शेकडो तरुणांसह वृद्धांचा जीव गेला. त्यामुळे ओमिक्रॉनच्या धास्तीसह आलेल्या जानेवारी २०२२ मधील तिसऱ्या लाटेची दहशत पसरली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. पण लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर अवघ्या दीड महिन्यात नियंत्रण आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता २० फेब्रुवारीला एकूण नवीन रुग्णांची नोंद ७४ झाली होती; तर १ हजार ११० रुग्ण सक्रिय होते. २१ फेब्रुवारीला रुग्णसंख्येत घट होऊन ती ५१ वर आली. सहा दिवस ही रुग्णसंख्या स्थिर होती. त्यानंतर प्रथमच जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्या ५०च्या आत ४३ वर आली. सक्रिय रुग्णसंख्याही निम्म्याने कमी होऊन ५७१ झाली; तर २८ फेब्रुवारीला जिल्ह्यात अवघ्या २२ नवीन रुग्णांची भर पडली. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून आतापर्यंत गेल्या दोन वर्षांतील हा पहिला निच्चांक समजला जात आहे. १ मार्चला पुन्हा ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांची नोंद कमी होत असल्याने ही आकडेवारी आणखी कमी झाल्यास किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Corona Fight
अजित पवारांच्या शब्दाला काही किंमत नाही, आधिवेशनाआधी फडणवीसांची टीका

शून्य रुग्णांची नोंद

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मागील पाच दिवसांत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका क्षेत्रात तीन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे समोर आले आहे. भिवंडी आणि मिरा-भाईंदर या दोन महापालिका क्षेत्रांत दोन दिवस शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ५४२ सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात आजच्या घडीला ५४२ रुग्ण सक्रिय असून बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. २० फेब्रुवारीला ही आकडेवारी हजाराच्या पुढे होती. ती आता निम्म्यावर आली आहे.

आव्हान कायम

दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तरी शून्य मृत्यूचे आव्हान अजूनही कायम आहे. गेल्या ८ दिवासांत १३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. २० आणि २८ फेब्रुवारीचा अपवाद वगळता रोज एक ते तीन मृत्यूंची नोंद होत आहे.

कोरोना रुग्णसंख्या

पालिका क्षेत्र २३ फेब्रुवारी २४ फेब्रुवारी २५ फेब्रुवारी २६ फेब्रुवारी २७ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी
ठाणे १४ २२ २१ १८ १७ ११
केडीएमसी ८ ५ ५ २ ४ २
नवी मुंबई १९ १४ २२ ०९ १९ ०२
मिरा-भाईंदर ०४ ०६ ०० ०१ ०० ०२
भिवंडी ०० ०० ०१ ०१ ०१ ००
उल्हासनगर ०२ ०४ ०३ ०३ ०० ०१
अंबरनाथ ०० ०१ ०० ०१ ०० ०१
बदलापूर ०० ०१ ०१ ०० ०० ००
ठाणे ग्रामीण ०८ ०४ ०६ ०५ ०२ ०३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()