मनोर : वसई तालुक्यात बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) पालघर जिल्ह्यातील (Palghar) छोट्या शेतकऱ्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये (Poultry farming) तयार पक्ष्यांच्या विक्रीस केलेली घाई आणि बड्या कंपन्यांकडून कोंबड्यांच्या घाऊक विक्रीचे प्रमाण घटवल्याने किरकोळ बाजारात जिवंत ब्रॉयलर कोंबड्यांच्या (Hens price increases) किमतीत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मोठी मागणी असताना, कोंबड्या उपलब्ध होत नसल्याने चिकनच्या दरात ४० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे किरकोळ विक्रीत घट झाल्याने विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असून, खवय्ये मात्र हैराण झाले आहेत
दोन आठवड्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला. हा प्रसार वाढू नये म्हणून खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे प्रादुर्भाव असलेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरातील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील छोट्या पोल्ट्री फार्मधारक शेतकऱ्यांनी नुकसान होण्याच्या भीतीमुळे तयार झालेल्या कोंबड्यांची विक्री करण्याची घाई केली. तयार कोंबड्यांची विक्री केल्यानंतर पोल्ट्री फार्ममध्ये पिल्लांचा भरणा न करता फार्म रिकामे ठेवण्यात आले आहेत.
त्यातच ब्रॉयलर कोंबड्यांचे पडलेले दर वाढविण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी `चिक्स हॉलिडे` राबवला होता. यात दोन आठवड्यांत पिल्लांचे उत्पादन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये नवीन उत्पादन घेण्यासाठी पिल्ले उपलब्ध नव्हती. किरकोळ बाजारात ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनची मागणी कायम आहे; परंतु पुरवठा कमी होत असल्याने किरकोळ चिकन विक्रेत्यांना कोंबड्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे मंगळवारी (ता. २) ब्रॉयलर कोंबड्यांचे दर किलोमागे १२८ रुपयांपर्यंत पोहोचले, तर घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना १४० रुपये प्रतिकिलोच्या दराने कोंबड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
चिकनचे दर ३०० पार जाणार!
पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांकडे कोंबड्या उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या पोल्ट्री फार्म बाळगणाऱ्या कंपन्यांकडून कोंबड्या विकत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे होळीच्या पार्श्वभूमीवर ब्रॉयलर चिकन ३०० रुपये प्रतिकिलोचा टप्प्या पार करणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशी ही दरवाढ
१) गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारामध्ये जिवंत कोंबडी १६० रुपये प्रतिकिलो, तर चिकन २०० रुपये प्रतिकिलोच्या भावात विक्री केली जात होते. दरवाढीनंतर जिवंत कोंबडी २०० रुपये प्रतिकिलो, तर चिकन २४० रुपये प्रतिकिलोच्या भावात विकले जात आहे.
२) ग्रामीण भागात चिकनचा दर २८० रुपयांवर पोहोचला आहे. किलोमागे ४० रुपयांची वाढ झाल्याने चिकनच्या किरकोळ विक्रीत घट होऊन किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. तर आधीच महागाईत वाढ होत असताना चिकनही महागल्याने खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.