Football sports
Football sportssakal media

नवी मुंबई : फुटबॉल प्रिमिअर लीगचे आयोजन; महिला फुटबॉलपटू घडविण्यावर भर

Published on

वाशी : नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal corporation) क्षेत्रातील विद्यार्‍थ्‍यांमध्ये विशेष करून मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण व्हावी या हेतूने महापालिकेमार्फत फुटबॉल प्रिमिअर लीगचे (football premier league) आयोजन करण्यात आले होते. फुटबॉल प्रिमियर लीगसाठी नवी मुंबईच्या पालिका शाळांमधून प्रति विभाग एक प्रमाणे १० संघाची निवड करण्यात आली होती. दहा संघात साधारणतः (women's craze for football) ७० विद्यार्थिनींचा समावेश आहे.

Football sports
ठाणे : कामगार हॉस्पिटलच्या गाळ्यांची चौकशी होणार; महापौर म्हस्के यांचे आदेश

विद्यार्थांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी महापालिकेकडून नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले जाते. यंदा आशियायी महिला चषक फुटबॉल स्पर्धा २०२२ चे यजमानपद नवी मुंबई शहराला मिळाले होते. त्याचे औचित्य साधून फुटबॉलला प्रोत्साहित देण्यासाठी पालिका शाळेतील २३ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान २७ शिक्षकांना फुटबॉल विषयक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाकरिता ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षक उपलब्ध झाले.

डिसेंबर महिन्यात मध्ये महापालिकेच्या शाळांतील १२ व नवी मुंबई क्षेत्रातील १२ महिला शिक्षक अशा मिळून २४ महिलांसाठी फुटबॉल प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे महिला शिक्षकांसाठी प्रशिक्षण देणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत झालेल्या आशियायी महिला चषक फुटबॉल स्पर्धा महापालिकेतील ४५ ते ५० विद्यार्थांना प्रत्यक्ष पाहण्याची संधीही महापालिकेच्या क्रीडा व शिक्षण विभागाने दिली होती.

विद्यार्थिनींचे मनोबल उंचविण्यास मदत

फुटबॉल प्रिमिअर लीगसाठी निवड केलेल्या संघाना ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनमार्फत सरावाकरिता प्रशिक्षक दिले. २ ते ४ मार्च या कालावधीमध्ये झालेल्‍या लीगमध्ये १० संघांतील प्रत्येक संघास ४ सामने खेळवण्यात आले. सामन्यातील कामगिरीनुसार ऐरोली, सानपाडा, रबाळे व कोपरखैरणे विभाग उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहे. उपांत्य व अंतिम सामने महापालिकेने निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण मैदानात खेळविण्यात येणार आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थिनींचे मनोबल उंचविण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.