crime news
crime newssakal media

मुंबई : अमली पदार्थ विकणाऱ्या महिला हद्दपार; ट्रॉम्बे पोलीसांची धडक कारवाई

Published on

मानखुर्द : ट्रॉम्बे कॅम्पसमधील अमली पदार्थ विकणाऱ्या (Drug selling) दोन महिलांना मुंबई उपनगर जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तहसीन शेख (वय ३३) आणि फिरदोस शेख (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघी ट्रॉम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरात अमली पदार्थांची विक्री करत होत्या. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या (Trombe police station) वरिष्ठ निरीक्षक रेहाना शेख यांनी निरीक्षक मोल कदम यांना मार्गदर्शन करत टोळीविरुद्ध कठोर भूमिका घेतली. कदम यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर निर्णय सुनावताना उपायुक्त (परिमंडळ सहा) कृष्णकांत उपाध्याय यांनी (Deported order) हद्दपारीचे आदेश दिले.

 crime news
औद्योगिक वीजदर अनुदान स्थगित; महाराष्ट्र चेंबरचा तीव्र विरोध

तरुणांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समाजात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ निरीक्षक रेहाना शेख यांनी पुढाकार घेऊन स्तुत्य पाऊल उचलले.

गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींच्या पत्नी तहसीन आणि फिरदोस अमली पदार्थांचा व्यवसाय ट्रॉम्बे परिसरात करत होत्या. त्यामध्ये गांजाविक्रीचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करत अखेर मुंबई उपनगर जिल्ह्यातून वर्षभरासाठी पोलिसांनी हद्दपार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.