तळोजा वसाहतीमध्ये पाणी टंचाई कायम; आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा
खारघर : तळोजा गाव (Taloja village) तसेच तळोजा वसाहतीत आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वारंवार अपुरा व अनियमित पाणी (Water supply problem) होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. तक्रार करूनही सिडकोकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तळोजा वसाहतीला नेहमीच पाणीटंचाईला (water scarcity) सामोरे जावे लागते. येथील रहिवाशांनी सिडको, पनवेल महापालिका, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांच्या कडे लेखी आणि भेटून समस्या मांडली आहे, मात्र तरीही समस्या जैसे थे आहे. त्यात दिवाळीनंतर सिडकोच्या (cidco) नवीन गृहनिर्मिती प्रकल्पात बहुतांश नागरिकांनी घरांचा ताबा घेऊन वास्तव्यास आले असून लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र पाणी समस्या कायम आहे.
तळोजा वसाहतीत एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. त्यात नागरिकांच्या तक्रारीत वाढल्याने सिडकोकडून पाणी उपलब्ध करून दिले जाते. दिवसातून केवळ तीस ते पस्तीस मिनिटे पाणी पुरवठा होतो, तोही कमी दाबाने होत असल्याने रहिवाशांना टँकरचा आधार घावा लागतो. तळोजा गाव फेज एक, दोन आणि लगतच्या सेक्टर ४० मधील सिडकोच्या बागेश्री गृह निर्माण सोसायटीत पाणी समस्या वाढत असून ग्रामस्थ आणि सोसायटीमधील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून लवकरच सिडकोविरोधात नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
तळोजा फेज २, सेक्टर २६ मध्ये आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अशीच अवस्था इतर सेक्टरमध्ये आहे. सिडकोकडे विचारणा केल्यास आमच्याकडेही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे उत्तर दिले जाते. दररोजच्या पाणीटंचाईमुळे अनेक अडचणी येत आहेत.
- जितेंद्र शेलार, रहिवासी
सिडकोकडून जलवाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात आले होते. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल.
- नानिक चोइथानी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.