Mla Raju Patil
Mla Raju Patilsakal media

डोंबिवली: ३२ नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बंद! रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणार

Published on

डोंबिवली : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-pune old highway) दहिसर-शिळफाटा दरम्यान दुकाने, हॉटेल, गोदामे यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणांमुळे (illegal construction) तब्बल ३२ नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बंद झाला आहे. परिणामी पाणी जाण्यास मार्गच नसल्याने नाल्यांमधील पाणी हे महामार्गावर येऊन अपघातांचे प्रमाण (Accident cases) वाढले आहे. या समस्येची दखल घेत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून नैसर्गिक नाले पुनर्जीवित करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे तहसीलदार (Yuvraj bangar) युवराज बांगर यांनी दिली.

Mla Raju Patil
तळोजा वसाहतीमध्ये पाणी टंचाई कायम; आठ दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा

महामार्गालगतचे काही भंगारमाफिया हे केमिकलमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडतात; परंतु नाल्यांचे प्रवाह नीट नसल्याने अनेकदा हे पाणी रस्त्यावर येते. आजूबाजूच्या गावांत, शेतात जाऊन जमिनींचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने शेती नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरत असल्याने १४ गावांतील विहिरी, बोअरवेललादेखील रसायनमिश्रित पाणी येऊ लागल्याची तक्रार ग्रामस्थांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे केली होती.

त्यानुसार आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेत समस्या मांडली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी (ता. ५) तहसीलदार बांगर यांनी आमदार पाटील यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, आयआरबी कंपनी, ग्रामसेवक व प्रशासक आदींनी दहिसर ते शिळफाटा दरम्यान रस्त्याची पाहणी केली. या वेळी वन विभागाच्या जागेवर भंगारमाफियांनी केलेले अतिक्रमण, बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले, माफियांचे रस्त्यावरील अतिक्रमण आदींची दखल घेत ही अतिक्रमणे लवकरच हटविण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.