कविता जगण्यासाठी बळ देते

कविता जगण्यासाठी बळ देते

Published on

वासिंद, ता. २८ (बातमीदार) ः भयावह वर्तमानात कविताच जगण्यासाठी बळ देते आणि कवी माणसाचे जगणे सुसह्य करतो, असे विचार ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी मांडले. वासिंद येथे साहित्य सौरभ मंचतर्फे शनिवारी (ता.२७) कवी भाऊ विशे यांच्या ‘वेदनेची वीणा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नायगावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
नायगावकर म्हणाले, तात्कालिकता, चिरंतनता, समाजकेंद्री आणि व्यक्तिकेंद्री ही अंगे कवितेला आवश्यक असून शतकांच्या पलिकडे गेलेली कविता आपल्याला स्वतःची तपासणी करायला प्रवृत्त करते.
कवी प्रा. अशोक बागवे म्हणाले की, वेदनेला ही सौंदर्य असते, हे कवीलाच कळते. अंतर्द्रृष्टीला चष्मा लागत नाही. कविता रक्तात असते, ती झऱ्यासारखी आतून उमलते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी भाऊ विशे, तर सूत्रसंचालन कवी भगवान जाधव यांनी केले. साहित्य सौरभ मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. यादव भिरूड यांनी आभार मानले.

कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
‘वेदनेची वीणा’ या कवितासंग्रह सृजनसंवाद प्रकाशनने प्रकाशित केला आहे. प्रकाशनप्रसंगी झालेल्या कविसंमेलनात कवी अशोक नायगावकर, कवी अशोक बागवे, कवी सतीश सोळांकुरकर, कवी नारायण लाळे, कवी संदेश ढगे, कवी राजीव जोशी, कवी गीतेश शिंदे यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.