Fruits
FruitsSakal media

नवी मुंबई : रसरशीत फळांचा गोडवा महागला; किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ

Published on

वाशी : दोन आठवड्यांपासून उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने रसरशीत फळांची (fruits demand) मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने तसेच राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे (untimely rain) फळबागांचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच फळांच्या दरांत किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ (fruit price increases) झाल्‍याचे व्यापारी सांगतात. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी म्हणून नागरिकांकडून रसदार फळांची खरेदी केली जाते. याचबरोबर कोरोनामुळे (corona) प्रत्‍येक जण आरोग्‍याची विशेष काळजी घेत आहे. केवळ चवीसाठी नाही तर डाएटसाठीही हंगामी फळांना चांगलीच पसंती मिळत आहे. तापमानात वाढ झाल्याने टरबूज, खरबूज, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, नारळपाणी यांसारख्या फळांना मागणी वाढली आहे.

Fruits
रायगड : सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७४ जोडपी अडकली विवाहबंधनात

एपीएमसीतील फळांचे प्रतिकिलो घाऊक दर

खरबूज १५ ते २२ रु.
डाळिंब ७५ ते १०० रु.
स्ट्रॉबेरी ७० ते ८० रु.
द्राक्ष ४० ते ७० रु.
संत्री २५ ते ६० रु.
मोसंबी २५ ते ४५ रु.
कलिंगड ९ ते १५ रु.

फळाचा राजा दाखल

उन्हाळ्यात आंब्याला सर्वाधिक मागणी असते. सध्या बाजारात असणारा आंबा किमान साडेचारशे रुपये किलो दराने विक्री होत आहे. हंगामाला सुरुवात झाली असली तरी पाहिजे तशी आवक न झाल्‍याने अद्याप आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. याचबरोबर अवकाळी पावसाचा फटकाही आंबा पिकावर झाल्‍याने दर वाढल्‍याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

Fruits
काँग्रेससाठी गडकरींचे मोठे विधान; ....अशी माझी मनापासून इच्छा

ज्यूसही महागले

उन्हाळ्यात ऊसाचा रस आणि इतर फळांच्या ज्यूसची मागणी वाढते. यंदा फळे महागल्याने ज्यूसदेखील महागल्‍याचे दिसून येत आहे; तर काहींनी दर स्थिर ठेवत ग्लासचा आकार मात्र लहान केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी विक्रीसाठी ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ स्वरूपातील ग्लास उपलब्ध करून दिले आहेत.

कोरोनामुळे नागरिक आरोग्याबाबत अधिक सजग झाले आहेत. हंगामी फळे खरेदीकडे अनेकांचा कल वाढलेला असतो. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटल्याने दरांत वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत टरबूज, खरबूज आणि आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरांत घसरण होऊ शकते.
- अशोक उंडे, फळ विक्रेता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()