महामुंबईत घरांचे भाव वाढणार; रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) सिमेंट व पोलाद यांच्यासह बांधकामाशी संबंधित सर्वच बाबींमध्ये वाढलेल्या भावांमुळे घरबांधणीचा खर्च (house construction expenses) वाढला असून हीच स्थिती कायम राहिली तर महिनाभरातच घरांचे भावही (house cost increases) प्रतिचौरस फूट सुमारे पाचशे रुपये वाढू शकतील, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांची संघटना (Builder union) क्रेडाई एमसीएचआयच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे व्यक्त केली.
यासंदर्भात सेक्रेटरी धवल अजमेरा व माजी अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. सध्याच्या स्थितीत दरवाढ टाळायची असेल तर सरकारने या क्षेत्राला सवलती देणे आवश्यक आहे. त्यात जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटची सवलत, आयकर सवलत आदींचा समावेश आहे. तसेच प्रीमिअमच्या दरात कपात करावी आणि एक एप्रिलपासून लागू होणारा एक टक्के मेट्रो अधिभारही तहकूब करावा आणि ग्राहकांना मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी, अशीही मागणी अजमेरा यांनी केली. असे उपाय योजले तरच भाववाढ टाळता येऊ शकेल, असेही या वेळी सांगण्यात आले.
रशिया-युक्रेन युद्ध काही दिवसांत थांबले तर सिमेंट व पोलाद यांचे उत्पादन वाढेल व मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने किमती कमी होऊ शकतील. कोणत्याही प्रकारे आमचा बांधकाम खर्च कमी झाला तर आम्ही तो फायदा ग्राहकांना लगेच देऊ, असेही अजमेरा म्हणाले. सध्या परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत दरवाढ होण्याची शक्यता जास्त आहे. कारण सध्याच्या स्थितीत हा खर्च आम्हाला परवडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कामे थांबवणार नाही!
आमची संघटना कायद्याने स्थापित झाली आहे, रेरा आदी यंत्रणांचेदेखील आमच्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे खर्च वाढला तरी सुरू असलेली बांधकामे थांबवण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही किंवा आमच्या सदस्यांनाही असा सल्ला आम्ही देणार नाही, असेही अजमेरा म्हणाले.
सध्याची स्थिती पाहता महामुंबई विभागात सणासुदीचा हंगाम संपला की एक ते दोन महिन्यांत दरवाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या करारांमध्ये दरवाढीची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही आम्ही रेरामध्ये जाऊन करू. बांधकामाच्या दर्जावर परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. फार तर घरातल्या एक-दोन सोयी कमी केल्या जातील.
- दीपक गरोडिया, माजी अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.