Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationSakal media

नवीन गृहप्रकल्‍प तहानलेलेच! सिडको वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले

Published on

नवीन पनवेल : पनवेल तालुक्यात महापालिका (Panvel Municipal corporation) क्षेत्राबाहेर एमएमआरडीएकडून (mmrda) मान्यता आणि परवानगी मिळालेले अनेक गृहनिर्माण प्रकल्प (housing project) उभे राहत आहेत. या टोलेजंग इमारतीमध्ये हजारो घरांची निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर खासगी गृहसंकुलेही (private housing society) उभी राहत आहेत. एकीकडे सिडको (cidco) वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले असताना तालुक्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना पाणी मिळणार कुठून, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्‍थित होत आहे.

Panvel Municipal Corporation
डोंबिवली : जलवाहिनीच्या कामासाठी नेवाळी नाक्यावरील वाहतूक मार्गात बदल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात या भागाचा नियोजित विकास करण्याच्या अनुषंगाने नैना प्रकल्प आणण्यात आला आहे. या अंतर्गत एकूण ११ टाऊन स्कीमचे नियोजन आहे. फेज निहाय या ठिकाणी नवनवीन वसाहती विकसित केल्‍या जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच लोकवस्ती वाढणार असून पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.

बाळगंगा धरणातील पाणी नैना क्षेत्राला देण्याचे नियोजन असले तरी एकूण लोकसंख्या आणि मिळणारे पाणी याचा ताळमेळ बसवण्यासाठी संबंधित प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. याशिवाय एमएमएमआरडीएने चारचा एफएसआय देऊन काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना उंच इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार सुकापूर येथे बालाजी सिम्फोनी, पळस्पे गावच्या हद्दीत मॅराथॉन, कोनपासून जवळच इंडिया बुल्स आणि भोकरपाडा या परिसरात हिरानंदानी हे प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आले आहेत.

Panvel Municipal Corporation
डोंबिवली : जलवाहिनीच्या कामासाठी नेवाळी नाक्यावरील वाहतूक मार्गात बदल

एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर घरे देण्यासाठी इमारती बांधून तयार आहेत. तर बहुतांश घरांची विक्रीही झाली असून नागरिक राहण्यास येत आहेत. मात्र याठिकाणी पाणीपुरवठ्‌यात अडचणी येत आहेत. सध्या पूर्ण क्षमतेने गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये लोक राहण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे फरशी पाणीटंचाई भासत नसली तरी भविष्यात हा प्रश्न अत्यंत गंभीर होणार आहे. याव्यतिरिक्त पळस्पे फाटा येथील गृहनिर्माण प्रकल्पालाही एमएमआरडीएने परवानगी दिली आहे.

त्यामधील पहिल्या फेजमध्ये इमारतींचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सदनिकाधारकांना राहण्यासाठी घरे हस्तांतरित केली जाणार आहेत. दुसऱ्या फेजचे बुकिंग सुरू आहे. नव्याने होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाला नेमके पाणी मिळणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अनेक खासगी प्रकल्‍पही उभे राहत आहेत. सध्या सिडको निर्मित खारघर, तळोजा, नवीन पनवेल येथील गृहसंकुलातील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्‍त आहेत. भूखंड विकून गृहसंकुल बांधण्यास परवागनी देण्याऐवजी सिडको, पनवेल महापालिकेने वाढती लोकसंख्या लक्षात घेउन पाण्याचे स्रोत वाढविण्यावर, नवीन जलकुंभ उभारण्यावर तसेच धरणाची पाणीपातळी वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्‍याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पात ठणठणाट

पनवेल परिसरात सिडको मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एक लाख घरे बांधण्याचा संकल्प प्राधिकरणाने केला आहे. रेल्वे स्थानकासमोरील जागांवर इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर ट्रक व बस टर्मिनल्स आणि मोकळ्या जागेवर गृहसंकुले उभारण्यात येत आहेत. त्यांना भविष्यात सिडको पाणी देणार कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तयार असलेल्‍या गृहसंकुलामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. रोडपाली खारघर आणि तळोज्‍यात तर गेल्‍या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई असून स्‍थानिकांनी अनेकदा निवेदन दिली आहेत शिवाय मोर्चा, आंदोलनेही केली आहेत. मात्र अद्याप ही पाणीसमस्‍या सुटलेली नाही. असे असताना एमएमआरडीकडून मान्यता मिळालेल्या गृहसंकुलांना पाणी द्यायचे कुठून आणि कोणी याविषयी बोलायला कोणीही तयार नाही.

नागरी वसाहती, गृहनिर्माण प्रकल्प उभारताना पायाभूत सुविधांबरोबरच मूलभूत सुविधांचे नियोजन होणे गरजेचे आहे. सिडकोने वसाहती विकसित केल्या मात्र येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी स्वतःच्या मालकीचे एकही जलस्त्रोत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पनवेल परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलांना मान्यता देत असताना त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचे काय, याबाबत एमएमआरडीएनेही विचार करण्याची आवश्यकता
आहे.
- किरण तावदारे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.