Ravindra-Waikar
Ravindra-Waikarsakal media

कर्करोगरग्रस्तांसाठी १०० खाटा उपलब्ध करा; आमदार वायकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published on

जोगेश्वरी : मुंबई उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक मूलभूत वैद्यकीय सुविधा (Basic Medical facility) पुरवताना प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांनी मुख्यमंत्र्यांना (uddhav Thackeray) पत्र लिहून सेव्हन हिल रुग्णालयात (seven hills hospital) कर्करोगग्रस्तांसाठी १०० खाटा उपलब्ध करून (beds for cancer patients) उपचारांची सोय करण्याची मागणी केली आहे. मुख्‍य पालिका आयुक्‍तांनाही या पत्राची प्रत पाठवण्‍यात आली आहे.

Ravindra-Waikar
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्र परीसर केंद्राला आनंद दिघे यांचे नाव

मुंबई शहरातील टाटा मेमोरिअल रुग्णालय हे कर्करोगावर परिपूर्ण उपचार करणारे एकमेव रुग्णालय असून या ठिकाणी विविध राज्यभरातून, जिल्ह्यातून तसेच देश व विदेशातून कर्करोगग्रस्त उपचारासाठी येतात. त्यामुळे दरदिवशी या रुग्णालयावरील ताण वाढत असून उपचारासाठी रुग्णांना महिनोन्महिने वाट बघावी लागते. अशा रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास रोगाच्या तीव्रतेत वाढ होऊन रुग्ण दगावण्याच्या संख्येत वाढ होते.

सेव्हन हिल रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधांसह कर्करोगग्रस्तांसाठी १०० खाटा उपलब्ध करून दिल्यास मुंबई उपनगरातील कर्करोगग्रस्तांना मोठ्या प्रमाणात आधार तर मिळेलच, त्याचबरोबर वेळेवर उपचारही मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्तांसाठी सेव्हन हिल रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केल्यास कर्करोगग्रस्तांना याचा लाभ मिळू शकतो, असे वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कर्करोग रुग्णालयासाठी आरक्षित जागेवर...

मुंबई पश्‍चिम उपनगरातील अंधेरीच्या (पूर्व) महापालिकेच्या कर्करोग रुग्णालयासाठी आरक्षित जागेवर सेव्हन हिल रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालय तर सुरू झाले, परंतु कर्करोग उपचाराची सुविधा अद्याप सुरू करण्यात न आल्याने ती सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.