Money Fraud
Money Fraudsakal media

मुंबई : कर्जाच्या प्रलोभनाने नागरिकांची लूट; महिलांसह चार जणांना अटक

Published on

घाटकोपर : कर्ज देण्याच्या प्रलोभनाने (Loan decoy) नागरिकांना लुटणाऱ्या घाटकोपर येथील कॉल सेंटरचा गुन्हे शाखेने (crime branch) पर्दाफाश केला. कॉल सेंटरवर मंगळवारी (ता. २९) छापा टाकला. त्यात महिलांसह चार जणांना अटक (four culprit arrested) केली आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. सतीश दुरगुडे, सागर फाटक, प्रथमेश पाताडे आणि दीपिका माळी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत; तर आकाश बिंड हा त्यांचा मुख्य साथीदार फरारी आहे. येथील एमजी रोडवर बेकायदेशीर कॉल सेंटर (illegal call center) चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली होती.

Money Fraud
कर्करोगरग्रस्तांसाठी १०० खाटा उपलब्ध करा; आमदार वायकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

त्यानंतर छापा टाकला असता चार जण कोणत्याही अधिकृततेशिवाय वेगवेगळ्या कर्ज योजनांचे नागरिकांना प्रलोभन दाखवत असल्याचे उघड झाले. दरम्यान, या टोळीच्या सदस्यांनी गरजूंशी संपर्क साधत त्यांना कमी सुलभ मासिक हप्त्यांसह वैयक्तिक आणि गृहकर्ज देऊ केले. इच्छुक ग्राहकांना नंतर त्यांची कागदपत्रे पाठवण्यास सांगण्यात आले. कर्जाच्या रकमेचा विमा उतरवण्याच्या बहाण्याने पैसे भरण्यास सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. या टोळीने वरळीतील एका रहिवाशाची अशा प्रकारे ८२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. एकूण पीडितांची संख्या अधिक असून, पोलिस आता त्यांच्या डेटाबेसची छाननी करत आहेत.

आकाश बिंड फरारी

पीडितांचे संपर्क तपशील देणारा आकाश बिंड हा फरारी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तो नफ्यातील ६९ टक्के रक्कम घेत होता, तर उर्वरित रक्कम आरोपींमध्ये वाटली जात होती, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.