डिझेल दर कमी करण्याबाबत लवकरच आदेश; शिष्टमंडळाला दिले आश्वासन
सफाले : येत्या दोन ते चार दिवसांत डिझेलवरील वाढीव दराबाबतचा (Diesel rate issue) प्रश्न निकाली काढणार, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. केंद्रीय मत्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी मच्छीमार संघटनांच्या (Fisherman union) शिष्टमंडळाला डिझेलवरील वाढीव दर कमी करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार शिष्टमंडळाची पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले आहे.
मंगळवार (ता. २९) रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष लिओ कोलास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मंत्री पुरी यांनी डिझेलचे दर कमी करण्याबाबत आदेश काढतो, असे सांगितले. देशातील मच्छीमारांसाठी लवकरात लवकर विशेष विकास दर्जा निर्माण करून मच्छीमारांची कायमस्वरूपी सुटका करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, मंत्री पुरी यांच्या या निर्णयासाठी एनएफएफचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी त्यांचे आभार मानले.
मच्छीमारांच्या या शिष्टमंडळात एनएफएफचे उपाध्यक्ष व एमएमकेएसचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस ओलॉन्सो सिमॉईस, जीएफसीबीचे अध्यक्ष वेलजीभाई मसानी, जीबीए अध्यक्ष तुलशीभाई गोयल, एनएफएफ सचिव ज्योती मेहेर व जगदीश फोफंडी आदी उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.