Corona
Corona sakal media

BMC : नव्या व्हेरिएंटचा शोध घेणार; ३०० हून अधिक रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग

Published on

मुंबई : मुंबईवर कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचे (Delta variant) वर्चस्व होते; पण आता डेल्टा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्याचे रूपांतर ओमिक्रॉनमध्ये झाले आहे; पण परदेशात पुन्हा कोरोनाच्या नवीन प्रकारांचा उद्रेक (corona new variant) झाल्याने जूनमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर, पालिका अकरावे जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) करत आहे. त्यातून नवा व्हेरिएंट निर्माण झाला का, याचा शोध घेतला जाणार आहे. ३०० हून अधिक कोविड रुग्णांच्या (corona patients) नमुन्यांवर जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. त्याचा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या अहवालावरून मुंबईत अजूनही ओमिक्रॉन हा प्रकार आहे की नाही, हे कळेल.

Corona
"ओबीसींच्या आरक्षण यादीत मराठ्यांना समाविष्ट करा"

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, ३०० हून अधिक नमुन्यांवर जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे, ज्याचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येईल. हा अहवाल महत्त्वाचा आहे कारण सध्याच्या कोरोना प्रकारात काही उत्परिवर्तन झाले आहे की नाही, हे कळेल. या अहवालाच्या आधारे, नवीन उत्परिवर्तनांना सामोरे जाण्यासाठी धोरण तयार करण्यास मदत होईल. या उत्परिवर्तनाला सामोरे जाण्यासाठी सध्याची व्यवस्था प्रभावी आहे की नवीन प्रणाली तयार करावी लागेल, याबाबत निर्णय घेण्यासाठी ११ वा जीनोम अहवालही प्रभावी ठरणार आहे.

कोणत्या जीनोममध्ये किती रूपे ?

आठव्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये २८० कोविड रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते, त्यापैकी २४८ मुंबईकरांमध्ये ओमिक्रॉनचा प्रकार आढळून आला; तर डेल्टा डेरिव्हेटिव्ह ८ टक्के म्हणजे २१ नमुन्यांमध्ये आढळून आले आणि कोविडची लागण झालेल्या ११ मुंबईकरांमध्ये डेल्टा प्रकार आढळून आला. सातव्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात २८२ पैकी १५६ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.