strike
strike Sakal media

नवी मुंबई : शौचालयातून पाणी भरण्याची नामुष्की; जनआंदोलनाचा इशारा

Published on

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या (Navi Mumbai Municipal corporation) मालकीचे स्वतःचे धरण (Dam) असताना शहरातील अनेक झोपडपट्ट्या आजही तहानलेल्या आहेत. पाणी टंचाईमुळे (water scarcity) रहिवाशांना सार्वजनिक शौचालयातून (Public Toilets) पाणी भरण्यासाठी रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र खैरणे एमआयडीसी (MIDC) परिसरातील श्रमिक नगरमध्ये पहावयास मिळते. आठवड्यातील पाच दिवस कमी दाबाने, अनियमित पाणीपुरवठा होतो. त्‍यामुळे नोकरी व्यवसायावरही परिणाम होत आहे.

strike
रायगड : पूर, दरडींचा धोका टाळण्यासाठी उभारणार बांबूची बेटे

आजूबाजूंच्या कंपन्याही आता पाणी देण्यास नकार देत असल्‍याने रहिवाशांचे म्‍हणणे आहे. याठिकाणी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो, त्‍यात शट डाऊन असले की शुक्रवारी जो पाणी पुरवठा बंद होतो, तो थेट रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू होतो. त्यानंतर पुन्हा सोमवारी नळाखाली रिकाम्या भांड्यांची गर्दी दिसते. नळाला पाणी कधी येणार या प्रतीक्षेत दिवस जातो, मात्र पाणी थेट पहाटे दोन वाजता तेही कमी दाबाने येते. त्‍यामुळे रोजच जागरण करावे लागते, तेव्हा कुठे पाणी मिळत असल्‍याचे संतप्त नागरिक सांगतात.

सध्या खैरणेतील अनेक परिसरात पाणीबाणी सुरू आहे. त्‍यामुळे नागरिकांना थेट महापालिकेच्या शौचालयाच्या पाण्याचा आधार घ्‍यावा लागतो. याठिकाणी देखील नागरिकांना पिण्यासाठी रात्री अपरात्री जागरण करावे लागते. परिसरातील स्टॅम्प पोस्ट कोरडे पडल्याने नागरिकांना सार्वजनिक शौचालयाबाहेर पाणी भरण्यासाठी रांग लावावी लागते. तुटपुंज्या पाण्यात कशीबशी कामे उरकून थेंब थेंब पाण्याखाली हंडे, प्लास्‍टिकचे ड्रम, पेप्सीच्या बाटल्‍या भरण्याची वेळ श्रमिकनगरमधील झोपडपट्टीतील रहिवाशांवर आली आहे.

strike
मुंबई : मालमत्ता करवसुली `रेकॉर्डब्रेक`; ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये करसंकलन

रहिवाशांची पाण्यासाठी पायपीट

खैरणे एमआयडीसीत हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी लोकांची वस्ती म्हणजे श्रमिक नगर होय. पाच हजार लोकसंख्येची ही वस्ती आहे. पूर्वी याठिकाणी चोवीस तास पाणी असायचे, मात्र सहा महिन्यांपासून येथील रहिवाशांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. याठिकाणी आठ सार्वजनिक नळ आहेत, मात्र सहा महिन्यांपासून फक्त दोनच नळांना पाणी येते, तेही कमी दाबाने. पहाटे दोन वाजता सुरू होणारे पाणी सकाळी पाच वाजेपर्यंत बंद होते. त्‍यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना सार्वजनिक शौचालयातून पाणी भरावे लागते.

जनआंदोलनाचा इशारा

दिवसभर नळाखाली कोरड्या भांड्याची गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असल्याने सामाजिक कार्यकर्ता अमित जाधव यांनी एमआयडीसी व नवी मुंबई महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र पाण्याचा प्रश्न काही अद्याप सुटलेला नाही. तसेच राष्ट्रीय जल आयोगाकडेही पत्रव्यवहार केला असून येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता व महापालिकेचे मुख्य शहर अभियंता यांनाही पाणीसमस्‍या सोडविण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.