उल्हासनगर : चोरीच्या मोबाईल विक्रीचा पर्दाफाश; आरोपी गजाआड
उल्हासनगर : चोरीचा मोबाईल वापरत असल्याप्रकरणी (Mobile Robbery) ताब्यात घेतलेल्या तरुणाने मोबाईल दुकानातून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार उल्हासनगर गुन्हे अन्वेषण (ulhasnagar crime branch) शाखेच्या पोलिसांनी दुकानात छापा मारला. या वेळी दुकानदार चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईलची विक्री (Mobile crime) करत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Fir Filed) करत त्याला अटक केली.
अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास सुरू होता. विशाल वाघे हा तरुण चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने विशालला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने तो मोबाईल दुकानदार संतोष रामचंद्र गुप्ता याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले यांच्या नेतृत्वाखाली गुप्ता याच्या दुकानावर छापा मारला मारला. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख रुपयांचे १२ मोबाईल जप्त केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.