विविध मागण्यांसाठी डहाणूतील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर
डहाणू : डहाणू तालुक्यातील (Dahanu) महसूल कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशाने आपल्या विविध मागण्यांसाठी डहाणू तालुका महसूल कर्मचारी संघटनेतर्फे डहाणू तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत संप (indefinite strike) पुकारला आहे. यावेळी तहसील कार्यालाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी पालघर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे (Palghar revenue department) अध्यक्ष किरण कामडी, डहाणू तालुका अध्यक्ष कल्याणी चोथे, सचिव आशिष शिंदे, प्रवीण देशमुख कर्मचारी उपस्थित होते.
अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, मंत्रालयस्तरावर प्रलंबित असलेल्या विभागनिहाय पदोन्नती प्रस्तावास पंधरा दिवसांत मान्यता देण्यात यावी, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.