मुंबई स्त्रियांसाठी असुरक्षित; अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
मुंबई : स्त्रियांवरील अत्याचाराच्या (woman harassment cases) घटनांमध्ये वाढ झाली असून स्त्रियांवरील अत्याचारांत मुंबई (Mumbai) प्रथम स्थानी असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिलाख लोकसंख्येमागे ५३.८१ इतके मोठे आहे. त्यात मुंबई १४.४ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर (Mumbai on top) असून पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (७.७७) आणि नगर (५.१५) तिसऱ्या स्थानी आहे. स्त्रीअत्याचाराच्या न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी दोन लाख २९ हजार २४२ (९७.८४ टक्के) प्रकरणांमध्ये बळी पडलेल्या स्त्रिया आजही न्यायाच्या प्रतीक्षेत (women's on justice waiting) असल्याचे ‘समर्थन टीम’ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
दिल्ली येथील निर्भया प्रकरणानंतर स्त्रिया स्वतः गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत. वर्ष २०२० मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे एकूण ३१ हजार ९५४ गुन्हे दाखल झाले. महिलांवर विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे यात नऊ हजार ९६५ (३१ टक्के) गुन्हे दाखल झाले. स्वतःच्या नवऱ्याकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून झालेल्या अत्याचाराचे सहा हजार ७२९ (२१ टक्के) गुन्हे दाखल झाले आहेत.
महिलांचे अपहरण पाच हजार २५४ (१६ टक्के) गुन्हे दाखल; तर बलात्कारासंबंधी दोन हजार ६१ (६ टक्के) गुन्हे दाखल आहेत. ८३२ महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वांत जास्त गुन्हे हे सोलापूर ग्रामीण (६०), अहमदनगर (५५), पुणे ग्रामीण (५०), नाशिक ग्रामीण (४५) व जळगावात (४०) गुन्हे दाखल झाले आहेत. १९७ महिलांचे हुंडाबळी घेण्यात आल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मुंबईत सर्वाधिक अत्याचार
राज्यात स्त्रियांवरील अत्याचारांच्या दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांचा विचार करता सर्वांत मोठा वाटा मुंबई शहर (१४.३४ टक्के), अहमदनगर (५.१५ टक्के), पुणे ग्रामीण (४.४७ टक्के), ठाणे शहर (४.४१ टक्के), पुणे शहर (३.३ टक्के) व नाशिक ग्रामीण (३.१८ टक्के) आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे मुंबई शहरात चार हजार ५८३ गुन्हे दाखल असून संपूर्ण राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण (दर लाख स्त्रीलोकसंख्येस) ५३.८१ टक्के; तर सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण अमरावती शहर येथे (११९.३९ टक्के) इतके आहे.
पोलिसांनी केलेली उकल
वर्ष २०२० मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या एकूण ३९ हजार ९५४ गुन्ह्यांपैकी १७ हजार ७२८ (५५.४८ टक्के) गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली; तर १४ हजार २२६ (४४.५२ टक्के) स्त्रिया न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या.
१८ ते ३० वयोगटात सर्वाधिक बलात्कार
१८-३० वर्षांच्या स्त्रियांवर सर्वाधिक बलात्कार झाले आहेत. वर्ष २०१९ मध्ये एक हजार ५४९; तर २०२० मध्ये एक हजार ४२० बलात्कार झाले. वय वर्षे ४५ ते ६० व त्याहीपेक्षा पुढील वयाच्या महिलांवरील बलात्काराचे प्रमाण वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढले आहेत. वर्ष २०१९ मध्ये ६१; तर वर्ष २०२० मध्ये ६८ गुन्हे घडले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात येतात, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तक्रारदार महिलांचे खच्चीकरण होते. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना आधार वाटण्यासाठी तक्रारीची उचित दखल घेण्यासाठी रूपरेषा ठरवण्यात यावी.
- रूपेश कीर, समर्थन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.