ठाण्यात मंगळवारपासून युवा साहित्य संमेलन; पहिल्या दिवशी साहित्य दिंडी निघणार
ठाणे : युवावर्गाला मराठी साहित्याविषयी (Marathi Literature) गोडी निर्माण व्हावी, तसेच तरुण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंगळवारी (ता. १२) आणि बुधवारी (ता. १३) ठाणे शहरात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे (Yuva sahitya sammelan) आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (Marathi Sahitya Parishad) युवाशक्ती समितीतर्फे दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून यंदा प्रथमच ते ठाण्यातील (Dr Kashinath Ghanekar) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रणव सखदेव असणार आहेत; तर माजी महापौर नरेश म्हस्के हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
युवा साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनस्थळाजवळून सकाळी ८ वाजता साहित्य दिंडी निघणार असून यात विविध विषयांवरील पथनाट्य, लोकनृत्य इत्यादींचे सादरीकरण होणार असून यात जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती बुधवारी कोमसापच्या दीपा ठाणेकर यांनी दिली.
राष्ट्रपतींना पत्र
साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रपतींना दहा हजार पत्रांचा तिसरा आणि शेवटचा बस्ता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पाठवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.