RTO
RTOsakal media

पनवेल परिवहन कार्यालय सुसाट; तब्बल ३५४ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल जमा

Published on

नवीन पनवेल : पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Regional transport office) वर्षभरामध्ये तब्बल ३५४ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल (Revenue collection) जमा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०४ कोटी ८८ लाखांची वाढ आहे. कार्यालयाने ८१.६९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत सुमारे ४० हजार ४४१ नवीन वाहनांची नोंदणी (New vehicle registration) प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली.

RTO
ठाण्यात मंगळवारपासून युवा साहित्य संमेलन; पहिल्या दिवशी साहित्य दिंडी निघणार

पनवेल आणि परिसरातील नागरिकांनी दुचाकीला अधिक पसंती दिली असून २२ हजार १९१ दुचाकींची नोंद झाली, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी बुधवारी दिली. १२ हजार ४६३ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. पनवेल शहराचा आणि परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्याही वाढत आहे. येथील रहिवासी हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तळोजा, एमआयडीसी या परिसरात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकीची अधिक खरेदी होते. पार्किंगच्या समस्येमुळेही दुचाकीला महत्त्व दिले आहे, अशी माहितीही दिली.

‘फॅन्सी’ क्रमांकाद्वारे साडेपाच कोटींची कमाई

पनवेल परिसरातील वाहनधारकांमध्ये आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आकर्षक क्रमांकाद्वारे वर्षभरात तब्बल पाच कोटी ४४ लाख ५० हजारांचा महसूल जमा केला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सुमारे पाच हजार ८१२ वाहनांना वाहनमालकांनी आकर्षक क्रमांक घेतले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी महसुलामध्ये वाढ झाली असून तरुण पिढीमध्ये आकर्षक क्रमांकाची आवड असल्यामुळे महसुलात वाढ होत आहे.

RTO
आकसापोटी केंद्रीय यंत्रणांचा वापर लोकशाहीला घातक - एकनाथ शिंदे

कोरोनामुळे महसूल बुडाला

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदीसह अनेक निर्बंध जाहीर केले होते. त्याचा प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामावर परिणाम झाला होता. त्यामुळे पनवेल उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कोटीपेक्षा जास्त महसूल बुडाला आहे. त्याचा सरकारच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम झालेला आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्रातील अधिक महसूल जमा करणाऱ्यांपैकी एक आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये आवडत्या क्रमांकाला तरुण अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे साहजिकच महसूल वाढत आहे. आवडत्या क्रमांकासाठी पैसे दिले असले तरी नियमांचे पालन करूनच तो लिहिलेला असावा. त्यामध्ये काही बदल केले तर त्यावर कडक कारवाई करण्यात येते.
- अनिल पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.