गणित ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघ रवाना

गणित ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघ रवाना

Published on

मुंबई, ता. ७ : ६ ते ११ एप्रिलदरम्यान हंगेरीतील एगर येथे होणाऱ्या अकराव्या ‘मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाड’ (इजीएमओ २०२२) स्पर्धेसाठी भारतीय मुलींचा संघ मंगळवारी मुंबई येथून रवाना झाला. यात महाराष्ट्रातील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
नाशिकची सानिका बोराडे आणि पुण्याची अनन्या रानडे या १७ वर्षीय मुलींनी भारतीय संघात स्थान पटकावले आहे. तसेच दिल्लीच्या अगरवाल भगिनी अनुष्का व गुंजन यांचाही या संघात समावेश आहे. त्यांच्यासोबत टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयकांचा चमूही स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. यात पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाच्या अदिती फडके, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेचे पुलकित सिन्हा आणि मुंबईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (आयआयटी मुंबई) रोहिणी जोशी यांचा समावेश आहे.
संघात निवड झालेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या आयओक्यूएम-२०२१, आयएनएमओ-२०२१ व टीएसटी-इजीएमओ या तीन टप्प्यांतील परीक्षांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा निकाल ११ एप्रिलला संध्याकाळपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.