डोंबिवली : `मोक्का`ची शिक्षा भोगूनही सोनसाखळी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
डोंबिवली : मोक्का कायद्याअंतर्गत (MCOCA Act) शिक्षा भोगून आल्यानंतरही सोनसाखळी चोरी करणााऱ्या (Gold Robbery) सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan crime branch) अटक केली आहे. आयाझ अन्सारी ऊर्फ आझाद अन्सारी (Thief Ayaz Ansari) (२८) असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या शांतीनगर व वर्तकनगर पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. अन्सारी हा २०१२ मध्ये मोक्का कायद्याअंतर्गत (culprit arrested) अटक झाला होता. डिसेंबर २०२१ मध्ये कारागृहातून तो बाहेर आला.
कल्याण पश्चिमेतील गांधारी येथे सकाळी मॉर्निंगला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी खेचून पळ काढला होता. खडकपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. पोलिस हवालदार प्रवीण जाधव यांनी या गुन्ह्यातील आरोपी दुर्गाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिस निरीक्षक आनंद रावराणे, मोहन कळमकर, संजय माळी, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड यांच्या पथकाने सापळा रचून अन्सारी याला दुचाकीसह ताब्यात घेतले.
सीसी टीव्ही फुटेज आणि चौकशीत अन्सारीने त्याचा साथीदार अकबर बेग, हसनेन बेग, अब्बास जाफरी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी ३३ हजारांची दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील अब्बास जाफरी याच्यावर सोनसाखळी, दुचाकी चोरीचे ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरात एकूण ३० गुन्हे नोंद आहेत; तर अकबर बेग याच्यावर दुचाकी चोरीचे ३ गुन्हे नोंद आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.