ATM robbery
ATM robbery sakal media

नवी मुंबई : एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करणारी टोळी गजाआड

Published on

नवीन पनवेल : एटीएममधून पैसे काढणाऱ्या (ATM Money Robbery) व्यक्तींचे लक्ष विचलीत करून एटीएमची अदलाबदल करून पैसे लंपास करणाऱ्या (Bihar gang busted) बिहारमधील टोळीला पनवेल गुन्हे शाखा (Panvel crime branch) कक्ष दोनच्या पथकाने नुकतीच अटक केली. ही टोळी घातक शस्त्रांसह एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह बँकांचे ८९ एटीएम कार्ड हस्तगत (ATM card seized) करण्यात आले आहेत.

 ATM robbery
डोंबिवली : `मोक्का`ची शिक्षा भोगूनही सोनसाखळी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचे लक्ष विचलीत करून फसवणुकीच्या घटना घडतात. याबाबत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील अनेक ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहपोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलिस आयुक्त महेश घुर्ये, उप आयुक्त सुरेश मेंगडे यांनी आदेश दिले होते.

 ATM robbery
मुंबईकरांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार घराजवळच दर्जेदार उपचार

त्याप्रमाणे सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने कर्नाळा स्पोर्टस क्लब परिसरात एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या दरोड्याची तयारी करत असताना बच्चा महावीर महातो, मुनीलाल कुमार कृष्णा महातो, नवीन इंदर सवान आदींना अटक केली. त्यांच्याकडून ८९ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. या प्रकरणी फसवणुकीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अशी झाली अटक

वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक झालेल्या व्यक्तींकडून या प्रकरणी माहिती घेऊन संबंधित एटीएम सेंटरमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा अभ्यास केला. त्यावेळी बिहारमधील एक टोळी सक्रिय असल्याबाबत खात्री झाली. ही टोळी काही कालावधीसाठी मुंबईत येऊन गुन्हे करून परत बिहार येथे निघून जाते, असे आढळून आले. त्यांच्यावर पाळत ठेवली असता, ही टोळी पनवेल शहर येथील काही एटीएम सेंटरवर दरोडा टाकणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.