Woman saree Fashion
Woman saree Fashionsakal media

नववधूचे ''सौभाग्यवती'' ब्लाऊज; ब्राईडल ब्लाऊजची प्रचंड क्रेझ

Published on

नवी मुंबई : लग्नात नवरीने नखशिखांत नटणे (Nauvari saree) फारच गरजेचे असते. कारण तिच्यासाठी लग्नाचा (wedding ceremony) दिवस हा एकदम खास असतो. अशा या लग्नात नवरीच्या प्रत्येक गोष्टी अगदी परफेक्ट व्हायला हव्यात. तिच्या हेअर कलरपासून ते तिच्या अगदी पायांच्या नेलपेंटपर्यंत सगळे अगदी टिपटाप असायलाच लागते. हल्ली ब्राईडल ब्लाऊजची (Bridal blouse craze) प्रचंड क्रेझ आहे. लग्नात ब्राईडने घालण्यासाठी भरतकाम केलेले खास ब्लाऊज मिळतात. हे ब्लाऊज दिसायला एकदम हटके आणि सुंदर दिसतात. त्यात काही हटके प्रकार सध्या चांगलाच भाव खात आहेत.

Woman saree Fashion
हल्लेखोरांच्या रक्तात मद्याचे अंश; आव्हाडांची खळबळजनक माहिती

हल्ली अगदी सर्रास दिसणारी फॅशन म्हणजे ब्लाऊजचा सौभाग्यवती हा प्रकार. कोणत्याही हेव्ही साडीवर अशा प्रकारे पाठ भरून शिवलेला ब्लाऊज आणि त्यावर केलेले हे भरतकाम छान शोभून दिसते. ब्लाऊजचा काठ जसा असतो अगदी त्यानुसार त्यांच्यावर सौभाग्यवती असे कोरून घेतले जात आहे. अशाच प्रकारे नवरदेवाचे नावही कोरून घेतले जाते.
गोल्डन आणि सिल्व्हर जरी किंवा दोऱ्यामध्ये हे काम करून मिळते. भरतकाम करणाऱ्यांकडे अशा प्रकारे भरतकाम करून दिले जाते.

ब्लाऊजवरच नाही, तर नवरी जी शाल घेते त्यावरही अशा पद्धतीने भरतकाम केले जाते. शालीवर वधू व वराचे नाव भरतकाम करून दिले जाते. यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. एक हजारापासून ते पाच हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात. विशेष म्हणजे असे भरतकाम करणारे मोजकेच असल्याने सध्या त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. त्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगलीच भर पडली जात असली, तरी एका ब्लाऊजसाठी किमान तीन ते चार दिवस द्यावे लागतात. जसे भरत काम असेल त्यानुसार त्याला वेळ व पैसा खर्च करावा लागतो. दिसायला हे भरतकाम चारचौघात उठून व खूप सुंदर दिसते. त्यामुळे असे भरतकाम करून घेण्याची वधू व करवल्यांमध्ये क्रेझ वाढली आहे.

Woman saree Fashion
कर्जत : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला केरळमधून अटक

बाहुंवर नक्षीकाम

शालूंवरील ब्लाऊज हे नेहमीच थोडे वेगळे आणि साड्यांच्या तुलनेत अधिक वजनदार असतात. अशा ब्लाऊजवर थोडे आणखी काम करून त्याला वजनदार केले जाते. ब्लाऊजच्या हातांवर काज काम, टिकल्या आणि बारीक जरीचे काम केले जाते. त्यामुळे हा ब्लाऊज अधिक चांगला आणि महागडा दिसू लागतो. तुमच्या साडीचा ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर त्याला भरण्यासाठी खास अशा ठिकाणी दिला जातो जिथे हाताने ब्लाऊजला खडे, जरी, टिकल्या लावण्याचे काम केले जाते. त्यामुळे एखाद्या साध्या ब्लाऊजलाही एक वेगळा लूक मिळू शकेल. बाहुवरील नक्षीकामात त्रिकोणी आकाराच्या शंकरपाळ्याची डिझाईनवर मनमोहक नक्षीकाम काढून त्या ब्लाऊजच्या सौंदर्यात भर टाकली जाते.

नेटेड आणि कटवर्क

हल्ली ब्लाऊजचा गळा डीप करण्यापेक्षा त्याला थोडा वेगळा पॅच वर्क आणि नेटेड असे काम करून ब्लाऊज तयार केले जातात. जे दिसायला खूपच सुंदर दिसतात. कोणत्याही प्रकारची साडी नेसली तरीही त्यावर असे ब्लाऊज चांगले उठून दिसतात. ब्लाऊजच्या गळ्याला टेंपल, डोली डिझाईन, वराती, वधू-वर असतात. त्यांना कटवर्क करून त्यावर छान फॅन्सी नेट लावल्या जातात. साडीचा रंग यावर या नेट अवलंबून असतात.

त्यामुळे जर डीप नेक असे काही नको असेल, तर असा पद्धतीने साडीचा ब्लाऊज करता येतो. सध्या तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक ब्लाऊजचे पॅटर्न आणि डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतात. पैठणी, कांजिवरम किंवा कोणत्याही प्रकारच्या साड्यांवर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवता येतात. जर साडीचा ब्लाऊज पीस आवडला नसेल, तर मिसमॅच ब्लाऊजपीस वापरून त्यावर अशा पद्धतीने काम करू शकतो. लग्नात अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवला, तर तो अधिक चांगला दिसू शकतो. त्यामुळे अगदी हमखास अशा काही डिझाईन्सची निवड केली जाते आणि लग्नात स्पेशल उठून दिसले जाऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.