BMC
BMC Sakal Media

मुंबई : धारावीत पालिकेच्या कामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता

Published on

धारावी : येथे संत रोहिदास मार्गावर पालिकेचे (BMC) काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा व सुरक्षा रक्षक नसल्यामुळे जीवितहानी (Mortality) होण्याचा धोका निर्माण झाला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या ग/उत्तर विभागातील धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला (Kala killa) या ठिकाणी मुंबई पालिकेतर्फे पर्जन्यवाहिनीचे काम (Footpath work) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

BMC
रायगड पोलीस दलाला अव्वल क्रमांकाचे नामांकन

हा मार्ग विभागातील नागरिकांच्या ये-जा करण्याचा व लहान मुलांच्या शाळेचा प्रमुख मार्ग आहे. या कामाच्या ठिकाणी जेसीबी उभी असून त्यावर लहान मुले खेळताना दिसून येत आहेत. जेसीबीखालील रेती खचल्यास ती तोल जाऊन खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. पालिकेचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी सुरक्षा कुंपण घालावे व सुरक्षारक्षक नेमावा, कायदेशीर कारवाई करून जीवितहानी टाळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव मणी बालन यांनी लेखी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()