book reading
book readingsakal media

रायगड: ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी वाचन गरजेचे; 'सकाळ'मार्फत मार्गदर्शन शिबिर

Published on

अलिबाग : वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची (career opportunities) संधी ठिकठिकाणी उपलब्ध असते; परंतु शिक्षण नसल्याने अनेकांना ती मिळत नाही. शालेय जीवनात वृत्तपत्र वाचनातून (Newspaper reading) चालू घडामोडीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वाचन करायला पाहिजे. ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी वाचन गरजेचे आहे, असे प्रतिपादन शनिवारी (ता. ९) अॅड. के. डी. पाटील (advocate k d patil) यांनी केले. झिराड येथील रायगड जिल्हा परिषद (Raigad zilla parishad) उच्च प्राथमिक शाळेमध्ये ''सकाळ''मार्फत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते.

book reading
कल्याण रेल्वे स्थानक बनला मृत्यूचा सापळा; तीन महिन्यात ७८ जणांचा मृत्यू

त्या वेळी मार्गदर्शन करताना ॲड. पाटील बोलत होते. शालेय पुस्तकांबरोबरच वेगवेगळ्या कथा, गोष्टींची पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तक हे आपले मित्र आहेत. विद्या धन हे सर्वांत श्रेष्ठ धन आहे, असे अॅड. पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, बेलोशीचे तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष अनंत औचटकर, बेलोशी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रामचंद्र पारंगे, शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल थळे, शिक्षक कृष्णकुमार शेळके, वृंदा घरत, उमेश ठाकूर, धनंजय घरत, सुचिता शास्त्री, ज्योती गायकवाड, प्रियांका म्हात्रे व विद्यार्थी उपस्थित होते.

रागावर नियंत्रण ठेवा

मोबाईलच्या सतत वापरामुळे विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड कमी झाली आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये राग निर्माण असल्याने त्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विनयशीलपणा आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विनम्रपणा ठेवावा. चांगले अधिकारी बनण्याचे ध्येय कायम असणे आवश्यक आहे. तरच आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो, असा मौलिक सल्ला ॲड. पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.