पारंपारिक इंधन जपणुकीसाठी तेल कंपन्यांची मोहीम
इंधनाच्या जपणुकीसाठी आता सक्षम मोहीम
मुंबई, ता. १० ः देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने नागरिकांनी पारंपरिक इंधनाचा जपून वापर करावा; तसेच त्याऐवजी हरित व स्वच्छ इंधन वापरावर भर द्यावा, यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सक्षम ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
उद्यापासून (ता. ११) सुरू होणारी ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत सुरू राहील. केंद्रीय पेट्रोलियम तसेच नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशांनुसार या मोहिमेत भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले जातील.
या मोहिमेचे उद्घाटन सोमवारी सकाळी यशवंतराव चव्हाण केंद्रातील विशेष कार्यक्रमात होईल. या वेळी इंधन बचतीचे महत्त्व सांगणारी शालेय विद्यार्थ्यांची लघुनाट्ये होतील, तसेच विविध स्टॉलवरूनही इंधन वाचविण्याची तसेच हरित इंधन वापरण्याची माहिती दिली जाईल. तसेच इंधन वाचविणारे एसटी महामंडळ, बेस्ट आणि पुणे परिवहन प्राधिकरण यांच्या डेपोतील काही अधिकाऱ्यांचा सत्कारही केला जाईल. तसेच या उपक्रमात मोठी जनजागृती केलेल्या काही शाळाप्रमुखांनाही गौरविण्यात येईल. या कार्यक्रमास तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पेट्रोलपंप चालक, नैसर्गिक वायूचे वितरक आदी हजर राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.