White Onion
White Onionsakal

White Onion: अलिबागच्या सफेद कांद्याला पर्यटकांची पसंती

Published on


Alibag News: रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक मोठ्या आवडीने अलिबागच्या सफेद कांद्याची माळ घेऊन जातात. औषधी गुणधर्म असलेल्या या सफेद कांद्याला नुकतेच विशेष आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्‍यामुळे सफेद कांद्याची मागणीही वाढली आहे.

White Onion
Alibag News: अलिबागमध्ये निवारा केंद्रासाठी १६० कोटींचा प्रस्ताव!

अलिबाग- मुरूडमध्ये येणारे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अलिबाग-वडखळ मार्गाने मुंबई, पुण्याकडे निघताना. या वेळी सफेद कांद्याची माळ, कलिंगड, आंबे, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे आवर्जून खरेदी करतात.

याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती पापड, कुरुडया, दह्यातील मिरच्या, चिंच, वाल, इतर कडधान्याबरोबरच जवळा, बोबींल, वाकट्या, खाऱ्या, खारे बांगडे, विविध प्रकारची खारवलेली मासळी आदी बेगमीच्या वस्‍तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

White Onion
Alibag Banana News : केळीच्या खोडापासून बनवली ‘दोरी’

ॠतुमानानुसार चिक्की, नारळीपाक, कोकम सरबत आदी खाद्यपदार्थांनाही ग्राहकांकडून मागणी वाढते. हे पदार्थ घेण्यासाठी मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी वेळ व पार्किंग समस्येमुळे अडचण येत असल्याने पर्यटक रस्त्याच्या दुतर्फा विक्रीस बसलेल्‍या आदिवासी महिला, कोळी महिला, स्‍थानिक नागरिकांकडून खरेदी करतात. त्‍यामुळे त्‍यांनाही रोजगार उपलब्‍ध होत आहे.

अलिबागला आल्यावर चिंचेच्या गोळ्यापासून कडधान्य, नाचणी, सुकी मासळी घेऊन जाता येते. त्यात सफेद कांदा विशेष आवडीचा झाला आहे. गतवर्षी १६० रुपये सफेद कांद्याची माळ होती, यंदा ती २०० रुपयांपर्यंत गेली आहे.


- ऊर्मिला रणदिवे, पर्यटक, गोरेगाव-मुंबई

White Onion
Alibag News : वनहक्‍क जमीनधारकांनाही यंदा एक रुपया पीक विम्‍याचा लाभ; आज शेवटचा दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.