माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान
sakal

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान

Alibag News: आंबा-नारळाच्या बागा असलेल्या शहरांमध्ये माकडांच्‍या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे
Published on

Alibag News: गेल्‍या काही वर्षांपासून माकड, वानरांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला असल्याने बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी वनविभागाकडून टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.(kokan News)

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान
Alibag News: अलिबागमध्ये निवारा केंद्रासाठी १६० कोटींचा प्रस्ताव!

शहरासह शेतशिवारात माकडांचा उपद्रव वाढला असून शेतकरी, नागरिकांचे नुकसान होत आहे. रायगड जिल्ह्यात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुरुड, रेवदंडा, अलिबाग, दिवेआगर, श्रीवर्धनसारख्या आंबा-नारळाच्या बागा असलेल्या शहरांमध्ये माकडांच्‍या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.(mumbai news)

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान
Alibag Banana News : केळीच्या खोडापासून बनवली ‘दोरी’

नागरीवस्तीत विपुल प्रमाणात अन्न मिळत असल्याने माकड-वानरांच्या संख्येत वाढ होत आहे. वन विभागाने उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिक सातत्याने करीत आलेले आहेत. माकडांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत माजलेली आहे. अनेक ठिकाणी माकडांनी हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत.

माकडांमुळे परसबाग व घरांचे नुकसान होत आहे. शेतातील पिकांवर ताव मारून त्यांची नासधूस करण्यात येत आहे. त्‍यामुळे वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केल्यानंतर वनविभागाने एक अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाने सुचवलेल्या मुद्द्यावरून राज्यशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली असल्याची माहिती अलिबाग वनविभागाकडून देण्यात आली आहे.(rajastan task force)

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान
Alibag News : वनहक्‍क जमीनधारकांनाही यंदा एक रुपया पीक विम्‍याचा लाभ; आज शेवटचा दिवस

तसेच माकडांचे निर्बीजीकरण करण्याच्या उपाययोजना वनविभागाकडून आखल्या जाणार आहेत. याचा अध्यादेश नुकतेच राज्यशासनाने प्रसिद्ध केला आहे.

माकड- वानरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. घरांवर उड्या मारल्याने घराची कौले सातत्याने तुटतात, त्यांची दुरुस्ती न केल्यास घराचेही नुकसान होते. त्याचबरोबर फळबागांचे नुकसान तर न मोजण्याइतके आहे. जितकी मेहनत करावी तितकी मेहनत वाया जाते. (Mangao farming News)


- सिद्धेश राऊत, आंबा बागायतदार, आक्षी.

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी टास्क फोर्स; शेती, बागायतीचे करोडोंचे नुकसान
Pune News : प्रोडीजी पब्लिक स्कूल मध्ये मनसेचे खळ खट्याक ; १० वी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकोट न दिल्याच्या निषेधार्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()